हिर्डोशी, ता. २३ : कोंढरी कोंढाळकरवाडी (ता. भोर) येथील गणेश मंदिरात गणेश जयंती उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या दोनदिवसीय सप्ताहाची सांगता शुक्रवारी (ता. २३) काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली.
यावर्षी सप्ताहाचे पंधरावे वर्ष होते. यावेळी गुरुवारी (ता. २२) कलश पूजन, विना पूजन, ध्वजारोहन, ज्ञानेश्वरी पूजन, सत्यनारायण महापूजा, गणेश जयंती, पालखी मिरवणूक, हळदी कुंकू समारंभ, बापू महाराज कंक यांचे प्रवचन, हरिपाठ, महाप्रसाद, प्रथमेश महाराज गुजर यांचे कीर्तन व रावडीच्या विठ्ठल-रुक्मिणी महिला मंडळाचे भजन तर शुक्रवारी काकडा, धारांबे सणसबाबा आश्रमचे मठापती नामदेव महाराज किंद्रे यांचे काल्याचे कीर्तन, आरती, मान्यवरांचा सन्मान व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट कोंढाळकरवाडी कोंढरी व ग्रामस्थ मंडळाने केले. दरम्यान गावची कन्या आदिती पारठे हिचा नासा अंतराळ संशोधन संस्थेला भेट देऊन आल्याबद्दल तर विशाल कोंढाळकर याची पोलिस म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल, तसेच कोंढरी गावचे माजी शिक्षक व मार्गदर्शक हभप पांडुरंग नलावडे गुरुजी यांना ग्रामस्थांकडून सन्मानित करण्यात आले. या सप्ताहास पंचक्रोशीतील भाविक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.