पुणे

निगुडघरच्या ओढ्यात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

CD

हिर्डोशी, ता. २८ : निगुडघर (ता. भोर) येथील ओढ्यात एका ४० ते ४५ वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी (ता. २४) समोर आली आहे. याबाबत निगुडघरचे पोलिस पाटील शिवाजी रेणुसे यांनी भोर पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.
निगुडघर येथील कोरड्या ओढ्यात शनिवारी सायंकाळी साडेपाच दरम्यान बेवारस पुरुषाचा सडलेला मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णा पवार, हिर्डोशी बीट अंमलदार अजय साळुंके, अभय बर्गे, सागर झेंडे, योगेश राजिवडे, ज्ञानेश्वर शेडगे यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह भोर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मृत अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे ४० ते ४५ असून उंची अंदाजे १६८ सेंटीमीटर आहे. अंगावर हाफ जीन्स पॅन्टचा बरमुडा असून कमरेला लेदरचा बेल्ट आहे. डोक्यावर केस नसून अंगावर कोठेही जखमा नाहीत. डाव्या हातामध्ये पितळी कडे आहे. थोडी वाढलेली पांढरी दाढी दिसत आहे. या वर्णनानुसार अशी व्यक्ती ओळखीची किंवा माहितीची असल्यास भोर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक आण्णा पवार व तपासी अंमलदार सहा. पोलिस उपनिरीक्षक ए. एच. खुटवड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT