हिर्डोशी, ता. ५ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश भोर तालुक्यात दर्शनासाठी आणण्यात आला होता. सजवलेल्या रथातून नेण्यात आलेल्या अस्थिकलशाचे दर्शन भोर शहर, म्हाळवडी व आंबवडे खोऱ्यातील नागरिकांनी घेतले.
भोरमध्ये मंगळवारी (ता. ३) सायंकाळी अस्थिकलश दर्शनासाठी आणण्यात आला. प्रथमतः म्हाळवडी येथे आमदार शंकर मांडेकर यांच्या सभेठिकाणी शेकडो लोकांनी दर्शन घेतले. त्यानंतर बुधवारी (ता. ४) भोर शहर व त्यानंतर सजवलेला रथ आंबवडे खोऱ्यातील गावातून पाठवण्यात आला. अजितदादांचा अस्थिकलश गावात आल्याचे समजताच गावागावातून महिलांसह नागरिकांकडून दर्शन घेण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी हरतळी येथील संगमावर अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले.
आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोरचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्या पुढाकारातून पुण्याहून भोरमध्ये आणलेल्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठीच्या नियोजनात राष्ट्रवादी शहराध्यक्ष संदीप शेटे, कार्याध्यक्ष सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, राजू भोसले व श्याम शेटे यांचे सहकार्य लाभले, तर अस्थिकलश विसर्जनावेळी अमित जाधव, सुनील थोपटे, प्रसाद महाजन, कुणाल धुमाळ आदी उपस्थित होते.
03064
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.