पुणे

आंबवडेत नागेश्वर मंदिर गर्दीने फुलले

CD

हिर्डोशी, ता. १५ : आंबवडे (ता. भोर) येथील पांडवकालीन प्राचीन श्री नागेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. यावेळी श्री नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची दिवसभर मोठी रांग लागली होती. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता.

मंदिरास विद्युत रोषणाई केली होती. पहाटे पुजारांनी पूजा केल्यानंतर आंबवडेचे माजी सरपंच रामदास जेधे, सुवर्णा जेधे या दांपत्याच्या हस्ते मंदिरात अभिषेक करण्यात आला. तालुक्यातील भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी ओघ सुरूच होता. मंदिराच्या समोरून येणाऱ्या पायऱ्यांवरून दर्शनासाठी सकाळपासून लागलेली मोठी रांग सायंकाळी पाचपर्यंत कायम होती. मंदिर परिसरात झाडांची सावली असल्याने प्रसन्न वातावरणात रांगेत उभे राहून भक्त शिस्तीने दर्शनाचा लाभ घेत असल्याचे दिसून आले.
भोर तालुक्यासह, भोर शहर, हिरडस मावळ, आंबवडे परिसरातील भाविकांची उपस्थिती मोठी होती. यात महिला व लहान मुलांचा सहभाग जास्त होता. मंदिराशेजारील सभामंडपात येवली ग्रामस्थ महिला मंडळाच्या सुरू असलेल्या भजनाने वातावरण संगीतमय झाले होते. दरम्यान, आंबवडे गावचे ग्रामदैवत काळभैरवनथाची काठी पालखी मिरवणूक नागेश्वर मंदिरात आणण्यात आली. देवाच्या काठीला नागेश्वराला भेटवण्यात आल्यावर मंदिराला प्रदक्षिणा घालून काठी उभारण्यात आली. पालखीतील देवतांना पंचगंगेत स्नान घालण्यात आले. ही महाशिवरात्रीची प्रथा गेले अनेक वर्षांपासून सुरु आहे.

नागेश्वर मंदिर येथे सोमवारपासून (ता .९) सुरू असलेल्या व ५४ वर्षांची परंपरा असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज प्रवचन, कीर्तन व जागर सुरू असून सोमवारी (ता.१६) काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
03093

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गौतम गंभीर टीम इंडियाचं प्रशिक्षक पद सोडणार? IPL संघाने दिली मोठी ऑफर...

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Latest Marathi News Live Update : सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयात दाखल; प्रकृतीत अचानक बिघाड

Sangli ZP Mahayuti : 'झेडपी'त सव्वा वर्षांचे चार अध्यक्ष करू, चंद्रकांतदादांची भूमिका; शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला प्रस्ताव

Gadhinglaj Panchayat : पक्षांपेक्षा गाव जिंकले! गडहिंग्लजमध्ये ‘आमचा गाव, आमचा उमेदवार’च्या लाटेत अनेकांचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT