पुणे

भोरमध्ये मंगळवारी गिरणी कामगारांची सभा

CD

हिर्डोशी, ता. २० : मुंबई गिरणी कामगारांना न्यायालयाच्या आदेशाने मुंबईत घर मिळाले पाहिजे म्हणून कामगार वीस वर्षे झगडत आहे. मात्र, याकडे सरकारकडून जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी आत्तापर्यंत विविध कामगार संघटना वेगवेगळ्या स्वरूपात संघर्ष करत होत्या. परंतू, आता १४ संघटना एकत्र आल्या असून मुंबईमध्येच घर मिळाले पाहिजे असा सर्व संघटनांचा निर्धार असल्यामुळे या संघर्षाला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्वांनीमिळून आंदोलनाचे नियोजन केले असून आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी (ता. २४) भोरमध्ये महत्त्वाची सभा घेतल्याची माहिती मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सचिव विठ्ठल करंजे यांनी दिली.
मुंबईमध्येच घर मिळाले पाहिजे, कामगारांच्या मुलांना मुंबईमध्येच नोकरी मिळाली पाहिजे, घरासाठी ज्या मुंबई गिरणी कामगारांनी अजून अर्ज भरले नाहीत त्यांना घरासाठी अर्ज भरण्याची परवानगी मिळाली पाहिजे, घराची लॉटरी लवकरात लवकर काढली पाहिजे, आत्तापर्यंत दोन हजार घरे मिळाली असून इतर नागरिकांनाकांनाही लवकरात लवकर घरे मिळाली पाहिजे या मागण्यांसंदर्भात आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी (ता. २४) भोरमधील श्रमिक हॉल येथे सकाळी अकरा वाजता होणाऱ्या सभेसाठी भोर, राजगड, मुळशी, पुरंदर, खंडाळा आदी तालुक्यातील गिरणी कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन करंजे आणि आनंदा मालप यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT