पुणे

रावडीतील तरुणांची परदेशी पॅराग्लायडिंग स्पर्धकाला मदत

CD

हिर्डोशी, ता. २० : रावडी (ता. भोर) येथे वातावरणात बदल झाल्याने उतरलेल्या एका परदेशी पॅराग्लायडिंग स्पर्धकाला गावातील तरुणांनी मदत करीत त्याला स्पर्धेठिकाणी पोहचविले. ही घटना गुरुवारी (ता. १९) दुपारी घडली.
महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणी (जि. सातारा) येथे पॅराग्लायडिंग वर्ल्डकप सुरू आहे. या स्पर्धेतील एक पॅराग्लायडर वातावरणात बदल झाल्याने रावडी येथे उतरला. हे समजताच गावातील महेश वाडकर, ऋषिकेश रवळेकर या तरुणांसह ग्रामस्थांनी तातडीने तेथे जाऊन त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधला. क्रिझस्टोफ मार्टिन ( पोलंड) असे त्या स्पर्धकाचे नाव होते. सुरवातीला अनोख्या वाटणाऱ्या तरुणांशी संवादानंतर मार्टीनने चांगल्याच गप्पा मारल्या. स्थानिकांनी दिलेली बर्फी खाल्ली. त्यानंतर तरुणांनी सुरु असलेल्या स्पर्धेठिकाणी दुरध्वनीवरून संपर्क साधला. तीन तासांच्या कालावधीनंतर स्पर्धेठिकाणाहून आलेल्या वाहनातून मार्टीन पाचगणीकडे रवाना झाला.
दरम्यान, पॅराग्लायडिंग मोठ्या वेगाने खाली आल्याचे तसेच उतरलेल्या ठिकाणी काट्याकुट्यात मार्टीनच्या पायाला किरकोळ खरचटले असल्याचे महेश वाडकर याने सांगितले. शिवजयंती उत्सवानिमित्त जमलेल्या स्थानिक शिवभक्तांच्या सोबतीने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा परदेशी मार्टीनने या वेळी दिल्या. पाचगणीला जाण्यापूर्वी त्याने तरुणांनी व ग्रामस्थांनी केलेली मदत, दिलेल्या प्रेमळ वागणुकीचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT