पुणे

भोरमधील ६५ संगणक परिचालक उद्या आंदोलनात

CD

हिर्डोशी, ता. २२ : महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर मागील १४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २४) मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित आंदोलनात जिल्ह्यातील ८२२ संगणक परिचालक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष कुडले यांनी दिली.
मुंबईतील आंदोलनाच्या अनुषंगाने भोर तालुक्यातील ६५ संगणक परिचालक आंदोलनात सहभागी होणार असून याबाबतचे निवेदन भोरचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांना शनिवारी (ता.२१) देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष कुडले, महेश किंद्रे सह महिला संगणक परिचालक उपस्थित होत्या. राज्यातील सुमारे २८ हजार ५०० ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेले अंदाजे २०,००० संगणक परिचालक गेली १४ वर्षे अत्यल्प मानधनावर काम करत आहेत. वाढती महागाई, अस्थिर सेवा अटी आणि अपुरी वेतनरचना यामुळे त्यांच्यावर आर्थिक अन्याय होत आहे. शासनाने वारंवार आश्वासने देऊनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेकडून केली जात आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन
मासिक मानधन १८ हजार रुपये
सामाजिक सुरक्षा, विमा व इतर शासकीय सुविधा
महिलांना प्रसूती रजा व इतर सेवा लाभ
ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक तांत्रिक साधनसामग्री

राज्यातील संगणक परिचालक गेली अनेक वर्षे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करत आहेत. मात्र त्यांना न्याय्य वेतन व सेवा सुरक्षा मिळत नाही. शासनाने अर्थसंकल्पात ठोस तरतूद करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
-संतोष कुडले, जिल्हाध्यक्ष संगणक परिचालक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीप ऑन फायर! पॉवर-प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला दिले ३ धक्के; पाहा Video

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Talegaon Chakan Road: तळेगाव-चाकण मार्गावर युवक बनले ‘देवदूत’! तातडीच्या प्रयत्नांमुळे अपघात टळले, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : लाडकी बहिण योजना बंद होणार नाही- सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT