पुणे

धानवली रस्त्याचा प्रश्‍न अखेर सुटणार

CD

हिर्डोशी, ता. २३ : धानवली (ता. भोर) या रायरेश्वराच्या पायथ्याथी डोंगरात वसलेल्या आदिवासी पाड्यावर जाणाऱ्या रस्त्यासाठी ठक्कर बाप्पा विकास योजनेतून मंजूर २० लाख रुपये निधीच्या, तर ५ लाख निधीच्या सभामंडपाच्या कामाचे शुक्रवारी (ता. २०) भूमीपूजन झाले. रस्त्याच्या कामाची प्रत्यक्षात सुरवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी घोडेगाव (ता. आंबेगाव) यांच्या माध्यमातून ठक्कर बाप्पा विकास योजनेंतर्गत आमदार शंकर मांडेकर यांनी मंजूर केलेल्या व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी निधीसाठी प्रयत्न केले. आदिवासी कल्याण संवर्धन संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुनील कोळपे व आदिवासी कोळी महादेव संघटनेचे भोर तालुकाध्यक्ष दत्तात्रेय धानवले व विस्तार अधिकारी शिवराज पाटील यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्राम विकास अधिकारी महेश कालेकर, मेघराज सोनवणे, महिपती धानवले, नथू धानवले, आनंद धानवले, दत्ता धानवले, भगवान धानवले, कोंडिबा धानवले, तुकाराम धानवले, तानाजी धानवले, सखाराम धानवले, दिलीप धानवले, नागेश धानवले, डी. एस. मोहिते व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

एकदाचं ठरलं! पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती १२ मार्चला तर १८ मार्चला ठरणार झेडपीचे अध्यक्ष; हात उंचावून सदस्य करणार मतदान, वाचा...

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT