पुणे

म्हसर येथे टँकरने पाणीपुरवठा

CD

हिर्डोशी, ता. १९ : म्हसर बुद्रुक (ता.भोर) येथे पाण्याच्या टंचाईमुळे पाण्याचा तुटवडा भासू लागल्याने महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी (ता.१७) पंचायत समिती अधिकारी, पदाधिकारी यांची भेट घेऊन तातडीने पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. त्याची दखल घेत बुधवारी (ता.१८) टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली.

म्हसर बुद्रुक मधील जाधव व म्हसुरकर आवाड येथे पाणी टंचाई झाली आहे. तसेच जलजीवन योजना अपूर्ण असल्याने शासनाकडून पाणी प्रश्नावर योग्य तो मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी मंगळवारी पत्रकाद्वारे केली. त्यानंतर गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे, सभापती मनीषा कंक, उपसभापती विशाल कोंडे, सदस्य राजेश बोडके यांनी पाणीपुरवठा अधिकारी मनीष भांबरे, ग्रामसेवक व ग्रामस्थांबरोबर चर्चा करून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यातून दुसऱ्याच दिवशी तातडीने प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यात आला.


01482

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT