पुणे

नारायणगावच्या उपबाजारात टोमॅटो लिलाव वेळेत बदल

CD

नारायणगाव, ता. १७ : जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो उपबाजारातील टोमॅटो लिलावाच्या वेळेत शुक्रवारपासून (ता. १९) बदल केला आहे. त्यानुसार टोमॅटोचे लिलाव सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन या वेळेत होतील, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक सचिन सरसमकर यांनी दिली.
टोमॅटो खरेदी- विक्रीत सुसूत्रता यावी, या उद्देशाने टोमॅटो लिलावाची वेळ निश्चित करावी, अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकरी व व्यापारी यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली होती. याबाबत निर्णय घेण्यासाठी शेतकरी व व्यापारी यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे, नवनिर्वाचित संचालक निवृत्ती काळे, प्रकाश ताजणे, अर्चना वारुळे, प्रियांका शेळके, सचिव रूपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे आदी उपस्थित होते.
सचिव रूपेश कवडे म्हणाले, ‘‘येथील उपबाजारामध्ये जुन्नर आंबेगावसह शिरूर, पारनेर, बीड, संगमनेर आदी भागातील शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी घेऊन येतात. टोमॅटो लिलावाची वेळ निश्चित करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार लिलावाची वेळ निश्चित केली आहे.’’
उपसचिव शरद घोंगडे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी टोमॅटोची निवड करून, प्रतवारी व क्रेटचे वजन करून टोमॅटो विक्रीसाठी आणावेत. क्रेटमध्ये वीस किलो टोमॅटो असावीत. व्यापाऱ्यांनी टोमॅटो बाजार भावात तफावत ठेवू नये. पारदर्शक पद्धतीने लिलाव करावेत. विक्रीनंतर शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पैसे लगेच घ्यावेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT