पुणे

सोशल मीडियावर वैभवची गुणवत्ता ''लाईक''

CD

नारायणगाव, ता.४: दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. बहुतेक मुलांना ७५ टक्के ते ८० टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळाले आहेत. या मुलांचे पालक किमान नव्वद टक्के गुण मिळणे अपेक्षित होते, अशी चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथील गुरूवर्य एकनाथ गोविंद देव प्रशालेतील वैभव कृष्णा मोरे या विद्यार्थ्याला चक्क पस्तीस टक्के गुण मिळाले आहेत. सर्व विषयात पस्तीस गुण मिळवणाऱ्या व काठावर पास झालेल्या वैभव याची मात्र गुणवत्तेत आलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे सोशल मीडियावर जोरदार स्वागत होत आहे.

शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याच्या बरोबरीत बोरी खुर्द परिसरातील ग्रामस्थ व शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी वैभव याचा सत्कार करून त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक गणपुले म्हणाले, की आमच्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतील वैभव
याचे पालक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. सुट्टीच्या दिवशी वैभव सुद्धा पालकांना मदत करतो. शालेय उपक्रमात तो उत्साहाने सहभागी होत असे. कबड्डी व क्रिकेटची त्याला विशेष आवड आहे. मात्र शिक्षणात त्याला फारशी आवड नव्हती. तरीही त्याने जिद्दीने अभ्यास केला आणि तो दहावीत चक्क पस्तीस टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. त्याच्या या आगळ्यावेगळ्या गुणवत्तेचे कौतुक होत आहे.
दरम्यान, संस्थेच्या संचालक मंडळातील विक्रम शिंदे, लक्ष्मण काळे पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी वैभवचे अभिनंदन केले आहे.

होत असलेल्या सत्कारामुळे माझा उत्साह व आत्मविश्वास वाढला असून या पुढे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.
- वैभव मोरे, विद्यार्थी

03656

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT