पुणे

‘अनायडर’मुळे बिबटे जाणार नैसर्गिक अधिवासात

CD

रवींद्र पाटे :सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता.३ : जुन्नर तालुक्यातील मध्य व पूर्व बागायती भागात बिबट्यांची संख्या वाढल्याने मानव बिबट संघर्ष निर्माण झाला आहे. पाळीव जनावरे व मानवावर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. पिंजरे लावून सुद्धा त्यांची संख्या नियंत्रणात येत नाही. बिबट्यांचा बछड्यासह वाढलेला वावर कमी करण्यासाठी, त्यांना नैसर्गिक अधिवासात जाण्यास प्रवृत्त करण्यासाठी जुन्नर वनविभागाच्या वतीने सौर उर्जेवर कार्यान्वित असलेले, परदेशी बनावटीच्या अनायडर या उपकरणाचा वापर नारायणगाव भागात प्रथमच करण्यात आला आहे.

नारायणगाव, वारूळवाडी, मांजरवाडी परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे .मागील महिनाभरात बिबट्यांच्या हल्ल्यात तीन शेतकरी जखमी झाले आहेत. पाळीव प्राणी, कुत्रे, मेंढपाळाचे वाडे यावर बिबट्याचे हल्ले रोजच होत आहेत. पिंजरे लावून सुद्धा बिबट्याचे हल्ले नियंत्रणात येत नाहीत. नारायणगाव परिसरात चार ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र, आता बिबटे पिंजऱ्यात अडकले जात नाहीत. काही भागात बछड्यासह बिबट्याच्या मादीचे वास्तव्य आहे. बछड्यांची ताटातूट होऊ नये म्हणून पिंजरा लावला जात नाही. अशावेळी मानवाची व बछडे, बिबट्यांची सुरक्षा याचा विचार करून बिबट्यांना मानवी वस्तीतील जागा सोडून अन्यत्र जाण्यास प्रवृत अनायडर हे स्वयंचलित उपकरण अतिशय प्रभावी आहे.


असे चालते अनायडरचे कार्य :
सौर ऊर्जेवर चालणारे अनायडर हे उपककरणं छोट्या पेटीच्या आकाराचे असते. या उपकरणात त्वचा सदृश सेंसर असतात. उपकरणापासून सुमारे शंभर फूट अंतरावर बिबट्या अथवा अन्य वन्य प्राणी आल्यास उपकरण कार्यान्वित होऊन त्यामधून विशिष्ट आवाज येतो. यामुळे बिबट्या व अन्य वन्य प्राणी आपली जागा सोडून सुरक्षितरित्या इतर ठिकाणी निघून जातो. उपकरणातून आवाज आल्यास बिबट्या आल्याची माहिती स्थानिक शेतकरी व रहिवासी यांना काही क्षणातच मिळणार आहे, अशी माहिती नारायणगाव विभागाचे वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.

पिंजऱ्यापेक्षा अनायडर उपक्रण हताळणे सुरक्षित आहे. लोखंडी पिंजऱ्याचे वजन सुमारे दीडशे ते दोनशे किलोग्राम असते. त्यामुळे हा पिंजरा हलवणे, हाताळणे हे अतिशय अवघड काम आहे. पिंजरा लावण्यासाठी व हलवण्यासाठी किमान पाच ते सहा माणसे, टेम्पोची गरज असते. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर अनेक वेळा जखमी होतात. शिवाय पिंजऱ्यात भक्ष्य ठेवण्याची आवश्यकता असते. तुलनात्मक दृष्ट्या पिंजऱ्यापेक्षा अनायडर उपकरण हताळणे सुरक्षित व सोयीचे आहे.
- सुशांत भुजबळ, आपदा मित्र

आर्वी येथे बछड्यांसह तीन बिबट्यांचा वावर होता. शेतकऱ्यांमध्ये अतिशय भितीचे वातावरण होते. बछडे व बिबट्यांची संख्या जास्त असल्यामुळे पिंजरा लावणे शक्य नव्हते. अनायडरचा वापर केल्याने बिबटे अन्यत्र निघून गेले. केरळ, उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या उपकरणाचा वापर केला जात आहे.
- ज्ञानेश्वर पवार, वनरक्षक

04761

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT