पुणे

कोल्हेमळा येथे आढळली बिबट्याची मागी मृतावस्थेत

CD

नारायणगाव, ता.१२ : येथील कोल्हेमळा (ता. जुन्नर) शिवारात रविवारी (ता.१२) सायंकाळी बिबट्याची दीड ते दोन वर्षांची मादी मृत अवस्थेत सापडली. या मादीला शिवविच्छेदनासाठी माणिक डोह येथील निवारा केंद्रात हलविले आहे, अशी माहिती वनपाल अनिता होले यांनी दिली.
कोल्हेमळा येथील राजेंद्र महादेव कोल्हे सायंकाळी त्यांच्या कोल्हे मळा येथील चारंग बाबा मंदिराजवळ असलेल्या उसाच्या शेतात गेले होते. यावेळी त्यांना शेताच्या कडेला असलेल्या रस्त्यावर बिबट्या आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी वनविभागावर दिली असता घटनास्थळी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार,आपदा मित्र सुशांत भुजबळ, ग्राम सुरक्षा रक्षक दल जवान अदित्य डेरे, वन कर्मचारी खंडू भुजबळ दाखल झाले. मृत बिबट मादीला शिवविच्छेदनासाठी माणिक डोह येथील निवारा केंद्रात दाखल केले. दोन बिबट्यांच्या झटापटीमध्ये बिबट मादीचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

Sugar-Free Thandai Recipe: उन्हाळ्यात सरबत पिऊन कंटाळा आलाय? मग ट्राय करा ही 'शुगरफ्री थंडाई'; फक्त 5 मिनिटांत तयार होणारी, झटपट आणि सोपी रेसिपी!

SCROLL FOR NEXT