पुणे

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राऊत दांपत्यांची निवड

CD

नारायणगाव, ता. १४ : ‘शून्य सर्पदंश मृत्यू दर प्रकल्प’ व ‘गरोदरपणातील सर्पदंश व उपचार’ या विषयावरील व्याख्यानासाठी नारायणगाव (ता. जुन्नर) येथील जागतिक आरोग्य संघटना सर्पदंश तज्ज्ञ समितीचे सदस्य, सर्पदंश व विषबाधा तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. पल्लवी राऊत यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले आहे. १९ मे ते २५ मेदरम्यान सिंगापूर येथे विषबाधा तज्ज्ञांची सात दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ टॉक्सिनोलॉजी यांच्यावतीने या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय उपचार पद्धती माहितीची आदान-प्रदान करण्यात येणार आहे. याचा लाभ रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी होणार आहे. या परिषदेत साठ देशांतील सुमारे पाचशे शास्त्रज्ञ, विषबाधा तज्ज्ञ डॉक्टर, जागतिक आरोग्य संघटनेचे तद्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत डॉ. सदानंद राऊत यांचे ‘शून्य सर्पदंश मृत्यू दर प्रकल्प’ या विषयावर, तर डॉ. पल्लवी राऊत यांचे विषबाधा क्षेत्रातील महिला, घोणस या विषारी सर्पदंशाची लक्षणे, उपचार व गुंतागुंत, गरोदरपणातील सर्पदंश व उपचार या विषयावर व्याख्याने होणार आहेत. मागील पस्तीस वर्षांपासून ग्रामीण व दुर्गम भागात वैद्यकीय सेवा पुरवीत असलेल्या डॉ. राऊत यांचे या निवडीबद्दल जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिकल असोसिएशनच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coastal Road BMW Accident : फ्लायओव्हरवरून थेट खाली कोसळली कार, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा जागीच मृत्यू; काय घडलं?

99 पर्सेंटाइलच्या वादानंतर सरकारचा मोठा निर्णय! आता इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशासाठी बारावीचे मार्कही मोजणार

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत काळाचा घाला! एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला; म्हणाले 'मॅनेजमेंट...'

Marathi News Live Updates : मरीन ड्राइव्हजवळ भरधाव BMW चा अपघात; तिघांचा मृत्यू, एक जण गंभीर

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT