नारायणगाव, ता. ३०: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबजारात सोमवारी (ता.३) टोमॅटो बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. लिलावात आज दुपारी चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला १ हजार १०० रुपये तर हलक्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला आठशे रुपये बाजारभाव मिळाला आहे.
आवक वाढल्याने कोथिंबीर व मेथीच्या बाजार भावात तुलनात्मक दृष्ट्या घट झाली. उपबाजारात झालेल्या लिलावात कोथंबीर जुडीला शेकडा १०१ ते २ हजार ५०१, मेथी शेकडा ४०१ ते २ हजार २०१, शेपू शेकडा : ४०१ ते १ हजार ४५१ रुपये असा बाजारभाव मिळाला.
उपबाजारात कोथंबीर, मेथी, शेपुच्या चार लाख ६ हजार जुड्यांची तर ७ हजार २५० टोमॅटो क्रेटची आवक झाली. पावसामुळे नुकसान झाल्यामुळे मागील दीड महिना येथील उपबाजारात कोथंबीर, मेथीच्या एक ते दीड लाख जुड्यांची आवक होत होती. कोथिंबीर जुडीला विक्रमी १०० रुपये १९० यांच्या दरम्यान तर मेथी जुडीला ३० रुपये ते ५२ रुपयाच्या दरम्यान, आठ दिवसांपासून जुड्याची आवक तिप्पट वाढल्याने बाजारभावात निम्म्याने घट झाली आहे. मागील तीन महिने टोमॅटो क्रेटला शंभर रुपये ते चारशे रुपयांच्या दरम्यान बाजारभाव होता. टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.