नारायणगाव, ता. ९ : नारायणगाव परिसरात बुधवारी दुपारी (ता.९) तीन नंतर सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे परिसरातील रस्ते व शेतामध्ये पाणीच पाणी झाले. परतीच्या या पावसाचा फटका काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाला प्रमाणात बसणार आहे.
नारायणगाव, येडगाव परिसरात २३ ते २६ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसांत ९५ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाचा सोयाबीन पिकाला फायदा झाला होता. जुन्नर तालुक्यात १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात यावर्षी सोयाबीनची लागवड झाली आहे. सद्यःस्थितीत सोयाबीन पिकाची काढणी व मळणीची कामे सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडून नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या द्राक्ष बागांच्या ऑक्टोबर छाटणीची कामे सुरू आहेत. १५ ते २० सप्टेंबर दरम्यान आगाप छाटणी झालेल्या द्राक्षाच्या वेलीत घड निर्मिती झाली आहे.
ढगाळ वातावरण व मुसळधार पावसामुळे घड निर्मिती झालेल्या वेलींवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
05669
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.