नारायणगाव, ता. १७ : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जुन्नर विधानसभा मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीची तुलना करता यंदाच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी २४ हजार २८० मतदारांची वाढ झाली आहे. यापैकी १० हजार ६८५ पुरुष, १३ हजार ५८९ महिला मतदारांची वाढ झाली आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जुन्नर विधानसभा मतदारसंघात ३ लाख १२ हजार २०५ मतदार होते. या पैकी १ लाख ५९ हजार ८३० पुरुष, १ लाख ५२ हजार ३७१ महिला तर इतर ६ मतदार होते. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या नवमतदार नोंदणीत मागील पाच महिन्यात एकूण ११ हजार ७१७ मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये ४ हजार ७६४ पुरुष, तर ६ हजार ९५१ महिला व इतर दोन मतदारांची वाढ झाली आहे. तालुक्यात एकूण ३५६ मतदान केंद्रे असून, त्यापैकी ग्रामीण भागात ३३१, तर शहरी भागात २५ मतदान केंद्रे आहेत.
नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट, प्रतिक्रिया सोशल मीडियावर टाकू नयेत, फॉरवर्ड करू नयेत, लाइक करू नयेत. कोणत्याही वैयक्तिक, सामाजिक व धार्मिक बाबी संदर्भातील पोस्ट टाकू नयेत, शेअर करू नयेत. विधानसभा निवडणूक शांततापूर्ण व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी सहकार्य करावे. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करावे.
- महादेव शेलार, सहाय्यक पोलिस निरीक्षक, नारायणगाव पोलिस ठाणे
एकूण मतदार - ३ लाख २३ हजार ९२२
पुरुष - १ लाख ६४ हजार ५९४
महिला - १ लाख ५९ हजार ३२२
इतर - सहा मतदार आहेत.
नवमतदार - ४ हजार ८९९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.