नारायणगाव, ता. ३: येडगाव (ता. जुन्नर) येथील खानेवाडी शिवारात लावलेल्या सोमवारी (ता. २) पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. तो सुमारे सहा वर्षांचा आहे. त्याला आज सकाळी माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल लहू ठोकळ यांनी दिली.
खानेवाडी येथील रुद्र कांबळे या मुलावर बिबट्याने बुधवारी (ता. २७) रात्री सात वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्या नंतर येथील शरद नेहरकर यांचा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्राही बिबट्याने फस्त केला होता. या घटनेची वनविभागाने तातडीने दखल घेऊन खानेवाडी येथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात ठेवलेल्या भक्षाची शिकार करण्यासाठी बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला आणि तो जेरबंद झाला.येडगाव परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
05902
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.