शेतकऱ्यांना सोसाव्या लागणार टंचाईच्या झळा
‘कुकडी’मधील धरणे मार्चनंतर गाठणार तळ : प्रकल्पात ११.९५७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक
नारायणगाव, ता.३ : कुकडी प्रकल्पांतर्गत अंतर्गत येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात रब्बी -उन्हाळी दुसरे आवर्तन २० फेब्रुवारीपासून सुरू आहे. ते २६ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. कुकडी प्रकल्पात आज अखेर ११.९५७ टीएमसी (४०.२९ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी प्रकल्पात आज अखेर १४.७७७ (४९.५९ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
प्रकल्पात २.७६ टीएमसी (९.३ टक्के) कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. उपयुक्त पाणी साठ्याची सद्यःस्थिती पाहता मार्च नंतर कुकडी प्रकल्प अंतर्गत धरणे तळ गाठणार आहे. एप्रिल ते जून दरम्यान प्रकल्प लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. यावर्षी कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात १५ ऑक्टोबर २०२४ अखेर २६. ७४५ टीएमसी (९० टक्के) उपयुक्त पाणी साठा झाला होता. रब्बीच्या पहिल्या आवर्तनात १० डिसेंबर २०२४ ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान सोडलेल्या ७.४८५ टीएमसीचा पाणी वापर झाला. हे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे या धरणात १५.६५ टीएमसी ( ५२.७७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. रब्बी -उन्हाळी असे दुसरे आवर्तन २० फेब्रुवारी २०२५ पासून सुरू करण्यात आले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या आवर्तनात ७.४८५ टीएमसी पाणी वापर केला जाणार आहे.
दरम्यान, कुकडीच्या पाण्याची मागणी वाढली आहे. कुकडी प्रकल्प अंतर्गत धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे.
कुकडी प्रकल्पाचा यांना होता लाभ
* जुन्नर
* शिरूर
* कर्जत
* करमाळा
* श्रीगोंदा
* पारनेर
कुकडी डावा कालव्याचे आवर्तन सुरू राहण्यासाठी...
१. येडगाव धरणाची पाणी पातळी राखण्यासाठी माणिकडोह धरणातून सोडले१२०० क्यूसेकने पाणी
२. डिंभे धरणातून ६०० क्यूसेकने येडगाव धरणात सोडले पाणी
३. कुकडी डावा कालव्याचे आवर्तन २६ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.
४.आवर्तनात ४.२८५ टीएमसी पाणी वापर होणार आहे.
पाणी वाटपावरून वाद
काही वर्षापासून शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा होत नाही. शेतकऱ्यांची वाढत चाललेली पाणी मागणी व कुकडी प्रकल्पात होत नसलेला समाधानकारक उपयुक्त पाणीसाठा त्यामुळे दरवर्षी कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून पाणी वाटपावरून वाद होत आहे.
मृत साठ्याचा करावा लागणार वापर
उन्हाळी आवर्तनासाठी मूर्तसाठ्याचा वापर करावा लागणार : कुकडी प्रकल्पाअंतर्गत सध्याची उपयुक्त पाणी साठ्याची स्थिती पाहता एप्रिल -मे महिन्यात उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होणार आहे. उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी पिंपळगाव जोगे धरणातील ३.५ टीएमसी मृत साठ्याचा वापर करावा लागणार असल्याची माहिती येथील कुकडी पाटबंधारे विभाग कार्यालयातून देण्यात आली.
प्रकल्पातून सद्यःस्थिती सुरू असलेले पाणी क्यूसेकमध्ये
१. कुकडी डावा कालवा......१४००
२. पिंपळगाव जोगे कालवा......२२५
३. डिंभे डाव्या कालवा......६००
४. डिंभे उजव्या कालवा......२२५
धरणनिहाय आज अखेरचा उपयुक्त पाणीसाठा टीएमसी (कंसात टक्के):
येडगाव..........१.१५७ (५९.५६ )
माणिकडोह..........२.३१८ (२२.७८)
वडज ..........०.५९१ (५०.४२)
पिंपळगाव जोगे ..........१.४१ (३६.४७),
डिंभे.......... ६.४७० (५१.७८)
06319
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.