नारायणगाव, ता. २८ : येथील वारूळवाडी- गुंजाळवाडी रस्त्यावर धुमाळीच्या ओढ्याजवळ दुचाकीवर चाललेल्या दोघांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
कुकडी पाटबंधारे विभागातील कर्मचारी दत्तात्रेय अर्जुन ढवळे व तुकाराम हरिभाऊ ढवळे हे गुरुवारी सायंकाळी नारायणगाव येथून गुंजाळवाडी येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वारूळवाडी हद्दीतील धुमाळी ओढा येथे बिबट्याने मोटर सायकलच्या मागे बसलेले तुकाराम ढवळे यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या पोटरीजवळील भागात बिबट्याचे सुळे खोलवर घुसले आहेत. इतरही ठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्यांना नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या भागात मागील आठवडाभरात बिबट्याने मानवावर केलेला हा चौथा हल्ला आहे. दोन ते तीन बिबटे टोळीने या भागात फिरताना दिवसा दिसत आहेत. यामुळे कांदा काढणी व शेतातील इतर कामे ठप्प झाली आहेत. या भागातील बिबट्यांना पिंजऱ्याची जाणीव झाल्यामुळे बिबटे आता पिंजऱ्यात अडकले जात नाहीत. वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारूळवाडीचे माजी सरपंच राजेंद्र मेहेर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.