नारायणगाव, ता. २३ : स्वातंत्र्यपूर्व काळापासून वारूळवाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीत सुरु असलेले दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगाव (ता. जुन्नर) येथील खासगी जागेत हलवण्याचा आदेश सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा पुणे ग्रामीणचे मुद्रांक जिल्हाधिकारी प्र. श. देशपांडे यांनी नारायणगावच्या दुय्यम निबंधक यांना दिले आहेत.
दरम्यान, बिल्डरच्या लाभासाठी व लोकप्रतिनिधीच्या आग्रहास्तव खासगी जागेत कार्यालय स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला वारूळवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून हा निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच विनायक भुजबळ यांनी दिला आहे.
याबाबत भुजबळ म्हणाले, ‘‘१९३५ साली येथील पुणे नाशिक महामार्गालगत वारूळवाडी येथे दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगाव सुरू केले. कार्यालयाची जागा मालकाने तहहयात करार करून दिली आहे. कार्यालय हलवायचे असल्यास ग्रामपंचायतच्या संसद भवन इमारतीत हलवावे. शासकीय कार्यालय बिल्डरने बांधलेल्या खासगी जागेत हलवू नये, अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यासोबत ग्रामसभा, मासिक सभा ठराव दिला आहे. यासंदर्भात जनहित याचिकासुद्धा दाखल केली आहे. असे असताना आमदार शरद सोनवणे यांच्या मागणीचा संदर्भ देऊन सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा पुणे ग्रामीणचे मुद्रांक जिल्हाधिकारी देशपांडे यांनी कार्यालय आशीर्वाद इन्फ्रास्ट्रक्चर नारायणगाव यांच्या नवीन इमारतीमधील तळमजल्यावरील युनिट ऑफीस नंबर २१ए ते एफ येथे स्थलांतरित करून त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे आदेश पत्रातून दुय्यम निबंधक नारायणगाव यांना दिले आहेत. यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.