पुणे

नारायणगाव येथील कृषिदुतांची कृषी हॅकेथॉन कार्यक्रमास भेट

CD

नारायणगाव, ता. ३: नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील (एबीएम) कृषिदूतांनी स्टुडन्ट रेडी प्रोग्राम २०२५-२६ अंतर्गत पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन कार्यक्रमास भेट दिली. यावेळी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट फार्मिंग, मृद व जलसंधारण व्यवस्थापन, फलन आणि रोग कीटक व्यवस्थापन, काढणीनंतर तंत्रज्ञान कचरा व्यवस्थापन, कृषी अर्थशास्त्र आदींबाबत माहिती घेतली.
कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद भुजबळ, प्रा. गिरीश निंबारकर, प्रा. मयूर जाधव, प्रा. सिद्धेश पवार, प्रा.समीर रासकर, प्रा. पाटीलबा खाडे, प्रा.चिराग भुजबळ प्रा. निकिता गोरडे,
काळवाडीचे सरपंच तुषार वामन,उपसरपंच बाबासाहेब वामन,तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले ,सहाय्यक कृषी अधिकारी दीपाली ढोले, तसेच डेक्कन व्हॅली फार्मर प्रोडूसर कंपनीचे अजय बेल्हेकर, सुनील वामन यांनी एबीएमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या अभ्यास भेटीमध्ये कृषिदूत सर्वम थोरात, देवकी देवकर विदुला कडवे,वैष्णवी बचिरे अवधूत वाकचौरे, विराज अर्जुन पवन थिटे, सुजल पाटील यांनी सहभाग नोंदवून त्या ठिकाणी आयोजित कृषी संदर्भातील नावीन्य असलेल्या १०० हून अधिक स्टॉलला भेटी देऊन नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

06683

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Pub Raid : पुण्यात पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य विक्री? मनविसे ने बंद पाडली फ्रेशर्स पार्टी, अर्ध्या रात्री नेमकं काय घडलं?

Pune Rain Alert : घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा 'येलो अलर्ट'

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

SCROLL FOR NEXT