पुणे

द्राक्ष भूषण पुरस्कारासाठी कृषिरत्न मेहेर यांची निवड

CD

नारायणगाव, ता. २५: ग्रेप ग्रोवर्स फेडरेशन ऑफ इंडिया, पुणे आणि नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स्, पुणे यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या द्राक्ष भूषण या राष्ट्रीय पुरस्कारासाठी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल घमाजी मेहेर यांची निवड झाली आहे.
ग्रेप ग्रोवर्स फेडरेशन ऑफ इंडिया, पुणे आणि नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स्, पुणे यांच्या वतीने रविवारी (ता. २७) सकाळी साडेनऊ वाजता विजयापूर (कर्नाटक) येथील बालमकर कनव्हेशन सभागृहामध्ये बेदाणा उत्पादन व प्रक्रिया - सद्यःस्थिती या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले आहे. या वेळी होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. चर्चासत्राचे उद्‌घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार बनसगौडा आर. पाटील (यत्नाळ) असतील.
अनिल मेहेर हे कृषी पदवीधर असून मागील पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ शेतकरी व शेती समृद्धीसाठी निरपेक्ष भावनेने कार्यरत आहेत.
इतर पुरस्कारार्थी ( कंसात विभाग) :विभाकर पाटील( कर्नाटक), महादेव चाकोते(सोलापूर),अशोक गायकवाड( नाशिक),जगन्नाथ म्हस्के( सांगली), सेंथिलकुमार(तामीळनाडू),स्व.कनका रेड्डी (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा)
6922

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Interfaith Blood Donation: बकरी ईद निमित्त मशिदीत सर्वधर्मीयांचे रक्तदान; ‘मानवता हाच खरा धर्म’चा संदेश

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT