पुणे

जागतिक नारळ दिनानिमित्त मंगळवारी नारायणगावात कार्यशाळेचे आयोजन

CD

नारायणगाव, ता. ३१ : जागतिक नारळ दिनानिमित्त, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, नारळ विकास बोर्ड (कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने मंगळवारी (ता. २) सकाळी १० वाजता नारळ लागवड कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे यांनी दिली.
कार्यशाळेत दापोली कृषी विद्यापीठ अंतर्गत भाटे येथील नारळ संशोधन केंद्रातील तज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी नारळाच्या विविध जाती, नारळ लागवड तंत्र, खत व्यवस्थापन, एकात्मिक कीटक आणि रोग व्यवस्थापन, नारळ विकास मंडळाच्या विविध अनुदान योजना आदींची माहिती देण्यात येणार आहे. कार्यशाळेत सहभागी शेतकऱ्यांनी किमान २० नारळाची रोपे लावल्यास प्रति रोप ३४० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यावेळी बुटक्या जातीच्या (ऑरेंज ड्वार्फ) नारळाच्या रोपांची विक्री कृषी विज्ञान केंद्रात करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विषयतज्ज्ञ भरत टेमकर यांच्याशी संपर्क ९४२२५१९१४३ साधण्याचे आवाहन केले आहे.

ऑरेंज ड्वार्फ नारळाची ठळक वैशिष्ट्ये
झाडाची उंची १६ ते १७ फूट, चार वर्षांत फळधारणा होते, फळांचा रंग नारंगी असतो. शहाळासाठी योग्य असलेली जात, नारळ वाळल्यास स्वादिष्ट खोबरे तयार होते, दरवर्षी १२० ते १५० नारळांचे उत्पादन, झाडाचे आयुष्य ३० ते ४० वर्षे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : परवानगी नाही... मुंबई खाली करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर येऊन खात्री करु... मुंबई हायकोर्टाचं परखड मत

6,6,6,6,6,6,6... पोलार्डचं वादळ! ८ चेंडूत ठोकले तब्बल ७ षटकार, Video Viral

Solapur News:'निजामशाहीत असलेल्या ‘त्या’ ५८ गावांचा पुन्हा संघर्ष'; मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यास उभा करावा लागणार स्वतंत्र लढा

Manoj Jarange: आमचा वाघ चार दिवसांपासून उपाशी, मग आम्ही सण का साजरा करायचा? महिलांचा महालक्ष्मीला भावनिक निरोप

Madhuri Elephant : ‘माधुरी हत्ती’ मठात परत येणे अशक्य? पुन्हा आंदोलन करण्याचा राजू शेट्टींचा इशारा

SCROLL FOR NEXT