नारायणगाव, ता.१४ : कुकडी प्रकल्पाअंतर्गत महत्त्वाच्या असलेल्या डिंभे डावा कालव्याची गळती थांबवून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी वारूळवाडी - नारायणगाव हद्दीतील १५ किलोमीटर टप्प्यातील सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या कालव्याची दुरुस्ती नुकतीच करण्यात आली. त्यामुळे आता पुढील पन्नास वर्षे अस्तरीकरणाला धोका उरला नाही. कालव्याची वहन क्षमता सुमारे एक हजार क्युसेक आहे. या कालव्याच्या दुरुस्तीमुळे लाभार्थी शेतकऱ्यांची शेती सुजलाम् सुफलाम् होणार आहे.
सन २००० मध्ये डिंभे धरणातून कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. या कालव्याचा वापर प्रामुख्याने डिंभे धरणातील सुमारे साडे सहा टीएमसी पाणी येडगाव धरणात व शेती सिंचनासाठी घोड शाखा कालव्यात, मीना पूरक कालव्यात सोडण्यासाठी केला जातो. सुमारे ३० वर्षांपूर्वी झालेल्या या कालव्याचे ठिकठिकाणी अस्तरीकरण, नाला मोरीची बांधकामे खचल्याने आवर्तन कालावधीत गळती होऊन पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. कालव्या लगतच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कालवा नादुरुस्त झाल्याने एक हजार क्युसेक वहन क्षमता असलेल्या कालव्यातून पाचशे क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडता येत नाही. यामुळे आवर्तन कालावधी लांबला जातो. कालव्याची गळती थांबवण्यासाठी माजी आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून कालव्याच्या दुरुस्तीसाठी कालवा विशेष दुरुस्ती अंतर्गत २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
कुकडी पाटबंधारे विभागाने नारायणगाव-वारूळवाडी हद्दीतील १५ किलोमीटर लांबीच्या कालव्यापैकी जास्त गळती होत असलेल्या सहा किलोमीटर भागाचे अस्तरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण केले आहे. यासाठी सुमारे १७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. दुरुस्त केलेल्या कालव्याची तळाची व दोन्ही बाजूची एकूण रुंदी १८.१० मीटर आहे.
लोखंडी जाळीचा प्रथमच वापर
वारूळवाडी-नारायणगावातील डिंभे डावा कालव्याची दुरुस्ती करताना अस्तरीकरणासाठी लोखंडी जाळीचा प्रथमच वापर केला आहे. यामुळे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे. अस्तरीकरणामुळे पाण्याचा वहनवेग वाढणार असून गळती बंद होणार असल्याने पाण्याची बचत होणार आहे. आवर्तन सुरू असताना कालवा फुटण्याचा धोका कमी होणार आहे. अशी माहिती हनुमंत भापकर यांनी दिली.
07333
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.