पुणे

नारायणगावात शेतकरी, व्यावसायिकांचे नुकसान

CD

नारायणगाव, ता. २१: नारायणगाव परिसरात मंगळवारी (ता.२१) दुपारी सुमारे पंधरा ते वीस मिनिटे ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. मागील पाच दिवसांत आज तिसऱ्यांदा पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी तसेच दिवाळीचे साहित्य विकणाऱ्या सर्वसामान्य व्यवसायिकांना फटका बसला

नारायणगावात सकाळपासून उकाडा जाणवत होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट व सोसाट्याचा वाऱ्यासह सुमारे वीस मिनिटे मुसळधार पाऊस पडला. मागील पाच दिवसांत तिसऱ्यांदा झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे. सध्या तालुक्यात द्राक्ष बागांची ऑक्टोबर छाटणी व छाटणी नंतरची मशागतीची कामे, फूल तोडणे हंगाम, सोयाबीनची काढणी व मळणी, रब्बी हंगामाची तयारी, कांदा रोप तयार करणे आदी कामे सुरू आहेत. पावसामुळे शेती मशागतीच्या कामात खंड पडत आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील कांदा लागवडीच्या पूर्व नियोजनासाठी शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपूर्वी कांदा रोप तयार करण्यासाठी शेतात बियाणे टाकले आहे. वाफे तयार केले आहेत. पावसामुळे कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. मागील पाच महिने सुरू असलेला पाऊस कधी थांबतो या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आहे.

सर्वसामान्य व्यवसायिकांचे नुकसान
अचानक आलेल्या पावसामुळे नारायणगाव बाजारपेठेत दिवाळीनिमित्त आवश्यक साहित्याच्या विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या पथारीवाले दुकानदारांचे विक्रीसाठी आणलेले साहित्य भिजून मोठे नुकसान झाले. विक्रीसाठी आणलेल्या पणत्या, रांगोळी, किल्ल्यावर ठेवण्यासाठी आवश्यक असणारी मातीची चित्रे, आकाशकंदील आदी साहित्य भिजून हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT