रवींद्र पाटे : सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता.१६ : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, वारूळवाडी, येडगाव या गावातील पाळीव जनावरांना वैद्यकीय सेवा पुरवावी या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सुमारे तीस लाख रुपये खर्च करून ऑगस्ट २०२० मध्ये वारूळवाडी येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी (श्रेणी एक) अद्यायावत इमारत उभारली आहे. गोपालकांना शासकीय व्हिजिटिंग फी घेऊन फिरतीद्वारे सेवा पुरवली जाते. दवाखान्यात सोनोग्राफी यंत्रणा, क्ष किरण यंत्राची वाणवा असल्याने पशुपालकांची गैरसोय होते.
पाळीव जनावरांचे रक्त लघवी नमुना तपासण्यासाठी प्रयोगशाळा आहे. फिरता पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी वाहन व चालक उपलब्ध आहे. तीन महिन्यांनी आयोजित केलेल्या शिबिरात जंत निर्मूलन गोळ्यांचे वाटप केले जाते. दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक-१चे पद रिक्त आहे.
पाळीव जनावरांची संख्या नगण्य
औषधोपचारासाठी दवाखान्यात येणाऱ्या पाळीव जनावरांची संख्या नगण्य आहे. शहरीकरणामुळे पाळीव जनावरे औषधोपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणे जोखमीचे असल्यामुळे औषधोपचारासाठी गोठ्यावर येण्याचा शेतकऱ्यांचा आग्रह आहे. यासाठी पशुवैद्यकीय फिरते पथक दररोज सात ते आठ गोठ्यांना भेट देते.
यांची आहे गरज
- सोनोग्राफी यंत्रणा, क्ष किरण यंत्र
- रेबीज लसीकरण
- मांजर, कुत्रा या पाळीव जनावरांसाठी औषधे
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन...........१३३ (गाय व म्हैस)
रेतन मात्रा...... जर्सी, खिलार, गिर
वंध्यत्व निर्मूलन संख्या...........४६७
वंध्यत्व निर्मूलन मोहिमा: तीन गावात
पशुवैद्यकीय शिबिरे.........४
गर्भ तपासणी.........६३१
जन्मलेली वासरे.........२२१
शवविच्छेदन.........५
खच्चीकरण.........६६
शस्त्रक्रिया.........०८
लसीकरण
लंपी........१,५१०
लाळ्या खुरकूत........१,५८६
घटसर्प.......७७१
आंतर विषार (शेळ्या मेंढ्यांसाठी) .......९६३
राणीखेत (कोंबड्यांसाठी).......३६०
चारा वैरण बियाणे वाटप:
मका: ९६० किलोग्रॅम
कार्यक्षेत्रातील पशुधन संख्या........... ३ हजार ३०० (गाय, बैल, म्हैस)
दवाखान्यात उपलब्ध सुविधा
औषधोपचार
वंध्यत्व तपासणी निवारण
रक्त
मूत्र नमुने तपासणी
कृत्रिम रेतन
गर्भधारणा तपासणी
शवविच्छेदन
लसीकरण
जंत-गोचीड-गोमाशा निर्मुलन
पशुपालन मार्गदर्शन
खच्चीकरण लहान व मोठ्या शस्त्रक्रिया
शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन
माझ्याकडे १४ जर्सी गायी आहेत. मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी शासकीय व्हिजिट फी घेऊन गोठ्यावर येऊन आजारी जनावरांवर उपचार करतात. जंत गोळ्या, हिरवा चारा बियाणे दिले जाते. लसीकरण केले जाते.
- संतोष शांताराम निंबारकर, गोपालक शेतकरी, वारूळवाडी
दुग्ध वाढीसाठी जनावरांना संतुलित चारा देण्याची गरज आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी वेळेवर रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. दर तीन महिन्यांनी जंताच्या गोळ्या द्याव्यात. पाळीव जनावरांसाठी कॅल्शियम टॉनिक, फॉस्फरस विटा, मिनरल मिक्स्चरचे वाटप केले जाते. जास्त दूध देणाऱ्या संकरित कालवडीची पैदास करण्यासाठी शासकीय दवाखान्यातील उच्च प्रतीच्या वीर्य मात्रा वापरून कृत्रिम रेतन करून घ्यावे. शासकीय सुविधांचा लाभ घ्यावा.
- डॉ. एस. आर. भोर, पशुधन विकास अधिकारी गट-अ) :
07479
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.