पुणे

नारायणगावात बैलजोडीसह गाडीची चोरी उघड

CD

नारायणगाव, ता. २० : ऊस तोडणी मजुराच्या बैलजोडीसह खटारगाडीची चोरी करून निघालेल्या आरोपीला नागरिकांनी मुद्देमालासह पकडून नारायणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीला गेलेली बैलजोडी व खटारगाडीचा २४ तासात तपास केला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली.
याप्रकरणी सुनील चिमाजी पथवे (वय २०, मु. पांगरी, ता. अकोले) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. युवराज पंडित सोनवणे (वय २२, रा. धसाणा, ता. सटाणा, जि. नाशिक) हे ऊसतोडीसाठी जुन्नर तालुक्यात कुटुंबासह आले आहेत. ऊस तोडणी करण्यासाठी सध्या ते नारायणगाव येथील खडकवाडी शिवारात वास्तव्यास आहेत. सोमवारी (ता. १७) रात्री अज्ञात व्यक्तीने बैलजोडीसह लोखंडी चाके असलेली खटारगाडी चोरून नेली. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने सोनवणे यांनी शोध घेतला असता, आरोपी सुनील पथवे हा त्याच्या मूळ गावी बैलगाडी घेऊन निघाला होता. शेतकऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन याबाबतची माहिती नारायणगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बैलजोडीसह खटारगाडी ताब्यात घेतली. चोरीला गेलेले बैल व खटारगाडी मिळाल्याने ऊस तोडणी कामगार युवराज सोनवणे यांनी शेतकरी व पोलिसांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT