नारायणगाव, ता. २७: शासकीय हमीभाव खरेदी योजना २०२५-२६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारात नाफेड हमीभाव केंद्र सुरू झाल्याने सोयाबीनला वाढीव भाव मिळाला आहे. यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करताना बाजारभाव व वजनात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टळणार आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी दिली.
शेतकरी अजित शिंगाडे यांच्या सोयाबीन पोत्याचे व वजन माप काट्याचे पूजन काळे, संचालक माऊली खंडागळे, सारंग घोलप, आरती वारुळे, प्रियंका शेळके यांच्या हस्ते करून नारायणगाव येथील उपबाजारात सोयाबीन खरेदीचा प्रारंभ गुरुवारी (ता.२७) सकाळी झाला. यावेळी सोयाबीन गोदामाचे उद्घाटन सोयाबीन उत्पादक शेतकरी खंडू कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी बाजार समितीचे संचालक नबाजी घाडगे, तुषार थोरात, संतोष चव्हाण, पणन मंडळाचे सोयाबीन खरेदी प्रतिनिधी सागर गावडे, बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे, सरपंच महेश शेळके आदी मान्यवर व सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सभापती काळे म्हणाले की, मागील पाच वर्षात सोयाबीनचे उत्पादन वाढले आहे. सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी मिळावी. यासाठी मागील दोन वर्षांपासून बाजार समितीचा पाठपुरावा सुरू होता. रविवार वगळता दररोज सकाळी दहा ते पाच या वेळात ५३ रुपये २८ पैसे प्रतिकिलोग्रॅम या बाजारभावाने सोयाबीन खरेदी केली जाईल. चार ते पाच दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. पणन मंडळाने सोयाबीन खरेदीतील अटी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
सोयाबीन खरेदीच्या अटी
- आद्रता १२ पेक्षा कमी असावी.
- काडीकचरा माती दगड नसावेत
- सातबाऱ्यावर सोयाबीनची खरीप हंगामातील (२०२५-२०२६) पीक पाहणी असावी.
- ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी सुरू राहील
- १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सोयाबीन खरेदी केली जाईल.
- बायोमेट्रिक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी स्वतः आधार कार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत, सातबारा व आठ अ उतारा घेऊन उपस्थित राहावे.
- एकरी जास्तीत जास्त ९४० किलोग्रॅम सोयाबीनची खरेदी केली जाईल.
07533
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.