पुणे

टोमॅटोसह कोथिंबिरीचे बाजारभाव गडगडले

CD

नारायणगाव, ता. २८ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात शुक्रवारी (ता. २८) टोमॅटोसह कोथिंबिरीच्या बाजारभावात मोठी घट झाली. मुंबई बाजारपेठेत मागणी कमी झाल्याने बाजारभावात सुमारे ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.
नारायणगावातील येथील उप बाजारात शुक्रवारी सकाळी साहू, विरांग,आर्यमान या जातीच्या सुमारे पाच हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली होती. जुन्नर, आंबेगाव, शिरूर,पारनेर तालुक्यातून शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी आले होते. प्रतवारीनुसार झालेल्या लिलावात टोमॅटो क्रेटला (२० किलो) १५० ते ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. वाढलेल्या थंडीमुळे सध्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मागील आठवड्यात चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला ७०० ते १००० रुपये दरम्यान भाव मिळाला होता. यामुळे उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारी अचानक बाजारभावात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. वाहतूक खर्च, तोडणी मजुरी, पॅकिंग आदींसाठी शेतकऱ्यांना प्रतिक्रेट सुमारे १०० रुपये खर्च येत आहे. भाव कमी झाल्याने टोमॅटो उत्पादकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

मेथी, शेपूचे बाजारभाव स्थिर
नारायणगाव उप बाजारात गुरुवारी (ता. २७) रात्री कोथिंबीर, मेथी, शेपूच्या सुमारे साडेचार लाख जुड्यांची आवक झाली होती. झालेल्या लिलावात कोथिंबीर जोडीला शेकडा शंभर रुपये ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. मेथी, शेपूच्या जुडीला शेकडा अनुक्रमे १५० ते ३०००, ५०० ते १८०० रुपये भाव मिळाला. मेथी, शेपूचे बाजारभाव मागील आठ दिवसापासून स्थिर आहेत.

7540

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur : अपघातात बहि‍णींचा मृत्यू, एकीचं ७ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, दुसरी महिन्याभराने चढणार होती बोहल्यावर

Latest Marathi news Live Update : परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीत एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेत

शिवसेनेच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार, शिंदेंच्याच पदाधिकाऱ्याची हायकोर्टात याचिका

Chandoli Koyna Tiger Territory : चांदोली, कोयना जंगलात वाघांनी हद्दी केल्या फिक्स, तीन वाघांमध्ये कोणाची दादागिरी

Crime News : थरार केरळमधील शोधमोहिमेचा! बोईसरच्या चिमुकल्याला पोलिसांनी मृत्यूच्या दाढेतून नाही, तर पित्याच्या विळख्यातून सोडवले

SCROLL FOR NEXT