पुणे

सृजनत्वाच्या उंबरठ्यावरील पंचमची घोडदौड

CD

नारायणगाव, ता. ५ : अश्व प्रदर्शनात बक्षीसे मिळवलेल्या व नऊ महिन्याची गरोदर असलेल्या वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील अश्व पालक राहुल बनकर यांच्या मारवाड जातीच्या घोडीला घोणस या अतिविषारी जातीच्या सापाचा दंश झाला होता. दहा दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतर घोडी व तिच्या गर्भाला वाचविण्यात यश आले आहे. विषारी सर्पदंश झालेल्या घोडीसह तिच्या पोटातील गर्भाला वाचविण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे, अशी माहिती जागतिक विषबाधा व सर्पदंश तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी दिली.
बैलगाड्याचा छंद असलेले राहुल बनकर यांनी मागील १० वर्षांपासून बैलगाडा सोडून घोडा (अश्व) पालनाचा छंद जोपासला आहे. वारूळवाडी येथील त्यांच्या तबेल्यात कोट्यवधी रुपये किंमत असलेले मारवाड जातीचे नऊ अश्व आहेत. यापैकी काजल व पंचम या दोन घोडींनी युओसी रेस कोर्स व पिंपरी चिंचवड येथील अश्व प्रदर्शनात बक्षीसे मिळवली आहेत.
पंचम घोडीच्या नाकपुडीला घोणस या विषारी सापाने २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दंश केला. विषबाधा झाल्याने घोडीचा चेहरा सुजला, नाकपुडी व तोंडातील लाळेतून रक्त येऊ लागले. श्वसनाचा त्रास सुरू झाला. बनकर यांनी या बाबतची माहिती माणसांवर उपचार करणारे सर्पदंश तज्ञ डॉ. राऊत यांना दिली. डॉ. राऊत यांनी घोडीचे वजन, रक्त चाचण्या याचे अवलोकन करून गोल्डन आवरमध्ये घोडीवर उपचार सुरू केले. उपचाराला प्रतिसाद मिळत असल्याने व घोडी गाभण असल्याने गर्भाच्या पुढील तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून तिला पुणे येथील रेन ट्री व्हेटर्नरी क्लिनिक येथे तीन दिवस दाखल करण्यात आले. डॉ. राऊत, डॉ. खंबाटा, मदतनीस मेहेर यांच्या सामूहिक प्रयत्नातून गाभण घोडी व तिच्या गर्भाचे प्राण वाचविण्यात यश आले. घोडी आता चारा व खुराक खात असून, धोका पूर्णपणे टाळला आहे. तसेच, पोटातील गर्भ सुद्धा सुस्थितीत असल्याचे तपासणीत आढळून आले आहे.

पंचम घोडीची माहिती
जात : मारवाड
वजन : ४५० किलो
उंची : ४.५ फूट
वय : ५ वर्षे
दैनंदिन खुराक खर्च : सुमारे ७०० रुपये
किंमत : अंदाजे २५ लाख रुपये

वैद्यकीय उपचारांचे तपशील
६० स्नेक अँटिव्हेनम इंजेक्शन्स
८० लिटर सलाईन
कृत्रिम श्वासोश्वास
प्रतिजैविके
वेदनाशामक औषधे
रक्त चाचण्या, सोनोग्राफी
उपचार खर्च : सुमारे १.५ लाख रुपये

विषारी सर्पदंश झालेल्या शेतकऱ्यांवर उपचार करण्याचा ३० वर्षाचा अनुभव आहे. या अनुभवाच्या आधारे घोडीचे वजन, तिच्या पोटातील नऊ महिन्याचा गर्भ व लक्षणे याचे अवलोकन केले. औषधाचा गर्भावर परिणाम होणार नाही, याचा विचार करून उपचाराचे नियोजन केले. गोल्डन आवरमध्ये स्नेक अँटिव्हेनम इंजेक्शन, सलाईन, कृत्रिम श्वासोश्वास, वेदनाशामक, प्रतिजैविके आदी उपचार केले. दहा दिवसाच्या वैद्यकीय उपचारानंतर घोडी व गर्भाला जीवदान मिळाले. यापूर्वी नाग, घोणस या विषारी सर्पदंश झालेला अभयारण्यातील सिंह, पाळीव कुत्रे, गाय यांच्यावर यशस्वी उपचार केले आहेत. मात्र, घोडी नऊ महिन्याची गाभण असल्याने यशस्वी उपचार करणे एक आव्हान होते.
- डॉ सदानंद राऊत, जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य/जागतिक विषबाधा व सर्पदंश तज्ञ

जिवापाड प्रेम असलेल्या पंचम घोडीचा जीव वाचल्याने मी व कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सर्पदंश तज्ञ डॉ. राऊत, पुणे येथील रेन ट्री व्हेटर्नरी क्लिनिकचे पशुवैद्यक डॉ. फिरोज खंबाटा, मदतनीस शुभम मेहेर यांनी केलेले योग्य उपचार व अथक परिश्रम यामुळे बेशुद्ध अवस्थेतील घोडी व तिच्या नऊ महिन्याच्या अर्भकाला जीवदान मिळाले आहे.
- राहुल बनकर, अश्व पालक, वारूळवाडी

07560, 07561

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पाकिस्तानच्या संसदेत गाढवाचा धमाकूळ; नेटकरी म्हणाले, तो त्याची जागा शोधतोय... व्हिडीओ व्हायरल

Income Tax Department : सावधान! तुमच्या या 10 व्यवहारांवर आयकर विभागाची कडक नजर; छोटी चूकही नोटीस आणू शकते!

Marathi Breaking News LIVE: सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘सुहाना स्वास्थ्यम्’ Live| Sakal

Mumbai News: वाघांच्या मृत्यूबाबत लपवाछपवी! प्राणीप्रेमींचा आरोप; ‘रुद्र’, ‘शक्ती’च्या मृत्यूमुळे प्रश्न

Farmer News: महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा! किमान आधारभावावर धान खरेदी प्रक्रिया सुरू; पण किती केंद्रावर?

SCROLL FOR NEXT