पुणे

‘मूल्य साखळी विकसित झाली तरच अपेक्षित आर्थिक मोबदला’

CD

नारायणगाव, ता. १३ : लहरी हवामानामुळे शेती उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठे व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे अभ्यास करण्याची गरज आहे. प्रत्येक पिकाची योग्य मूल्यसाखळी विकसित झाली तरच शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक मोबदला मिळू शकेल, असे मत राज्याचे माजी कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल (भा.प्र.से.) यांनी व्यक्त केले.
कृषी विज्ञान केंद्र आयोजित ग्लोबल कृषी महोत्सव २०२६ पीक परिसंवाद कार्यक्रमात डॉ. सुधीरकुमार गोयल बोलत होते. यावेळी माजी संचालक (फलोत्पादन) डॉ. सुदाम अडसूळ, डॉ. जी. के. ससाणे, ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाश पाटे, कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे, मोनिका मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे आदी मान्यवरांसह ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
डॉ. गोयल म्हणाले की, कृषी विमा योजना, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) असूनही शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही. त्यामुळे उत्पादक ते ग्राहक अशी मूल्यसाखळी सक्षमपणे उभारणे अत्यावश्यक आहे.
कृषी आयुक्त उमाकांत डॉ. दांगट, माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
केव्हीकेचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी प्रास्ताविक केले. ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह रवींद्र पारगावकर यांनी आभार मानले.

07745

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

विदर्भात काळीज पिळवटणारी घटना! कडाक्याच्या थंडीत काळ्या बॅगमध्ये आढळली ८ दिवसांची चिमुकली, आई वडिलांचा शोध सुरु

Video: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांने इतका जोरात सिक्स मारला की CSK च्या फॅनच्या गालाला झालं फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update : रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट, कार्यकर्ता गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT