नारायणगाव, ता. १५ : जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जुन्नर तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादी जाहीर केली. त्यानुसार जुन्नर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील मतदारांची संख्या वगळून तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट व सोळा पंचायत समिती गण मिळून एकूण ३ लाख ७ हजार २२३ मतदार असणार आहेत. या पैकी १ लाख ५१ हजार ३५५ स्त्री, तर १ लाख ५५ हजार ८३३ पुरुष व ५ इतर मतदार आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांनी दिली.
नऊ वर्षांपूर्वी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्यांची संख्या सात होती, तर पंचायत समिती सदस्य संख्या १४ होती. त्या तुलनेत एक गट व दोन गण वाढल्याने जिल्हा परिषद सदस्य संख्या आठ, तर पंचायत समिती सदस्य संख्या सोळा झाली आहे. मागील निवडणूकीत एकूण २ लाख ६३ हजार २०९ मतदार होते. त्यापैकी १ लाख २७ हजार ९८ महिला मतदार, तर १ लाख ३६ हजार १११ पुरुष मतदार होते. मागील निवडणुकीच्या तुलनेत आता होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारांच्या संख्येत एकूण ४४ हजार १४ने वाढ झाली आहे. आठ गटांपैकी बारव- पाडळी या गटात सर्वाधिक ४१ हजार ३०२ मतदार आहेत.
गट व गणनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे :
डिंगोरे- उदापूर गट एकूण मतदार : ३९ हजार ७१. डिंगोरे गण : १७ हजार ९२५, उदापूर गण : २१ हजार १४६.
ओतूर- धालेवाडीतर्फे हवेली गट एकूण मतदार : ३७ हजार ३७३. ओतूर गण : १९ हजार २४९, धालेवाडीतर्फे हवेली गण : १८ हजार १२४.
आळे- पिंपळवंडी गट : ४० हजार ६४३. पिंपळवंडी गण : २२ हजार ५८१, आळे गण : १८ हजार ६२.
बेल्हे- राजुरी गट : ३८ हजार ६३५. राजुरी गण : १८ हजार ८२३, बेल्हे गण : १८ हजार ८१२.
बोरी बुद्रुक- खोडद गट : ३६ हजार १११. बोरी बुद्रुक गण : १७ हजार ४१६, खोडद गण : १८ हजार ६९५.
नारायणगाव- वारूळवाडी गट : ३७ हजार १८५. नारायणगाव गण : १९ हजार ८०६, वारूळवाडी गण : १७ हजार ३७९.
सावरगाव- कुसूर गट : ३६ हजार ९०३. सावरगाव गण : १७ हजार ६१८, कुसूर गण : १९ हजार २८५.
बारव- पाडळी गट : ४१ हजार ३०२. बारव गण : २० हजार ६७७, पाडळी गण : २० हजार ६२५.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.