नारायणगाव, ता. २९ : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करून तुला कापून टाकील, अशी धमकी देणाऱ्या तरुणावर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना बुधवारी (ता. २८) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली. या प्रकरणी यश जयसिंग भुजबळ (वय २३, रा. नंबरवाडी, वारूळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रोहन गणपत सपकाळ (वय २४, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यश हा बुधवारी रात्री एटीएममधून पैसे काढण्यासाठी
गेले होते. दरम्यान, रोहन सपकाळ हा कोयता हातात घेऊन आला. त्याने दमदाटी करून शिवीगाळ केली. धारदार कोयत्याचा धाक दाखवून मी तुला कापून टाकीन अशी धमकी दिली. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.