पुणे

जुन्नरमध्ये बंडखोरांची राजकीय कोंडी

CD

नारायणगाव, ता. ११ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या व पक्ष नेत्यांनी सांगूनही अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक लढविणारे जुन्नर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, माजी सरपंच, तालुका युवती महिला अध्यक्ष या चार मातब्बरांना मतदारांनी नाकारले आहे. यामुळे या नेत्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ नेते पांडुरंग पवार, माजी सरपंच अजिंक्य घोलप,तालुका युवती अध्यक्ष अक्षदा पानसरे-मांडे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख व बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे या मातब्बरांना पराभवाचा धक्का बसला आहे. पक्षाशी प्रतारणा केल्यामुळे पवार, खंडागळे यांना तालुकाध्यक्षपद, पानसरे यांना युवती अध्यक्षपद गमवावे लागले आहे. पांडुरंग पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. पक्षाने त्यांना सलग चार वेळा जिल्हा परिषदेची उमेदवारी, जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची संधी दिली होती. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. पवार यांनी बोरी बुद्रुक गटातून सून कविता पवार यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती; मात्र पक्षाने कल्पना काळे यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या पवार यांनी या गटातून सून कविता यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी मागे घेण्यास सांगितले होते; मात्र त्यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवली. हीच परिस्थिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्याबाबत झाली. खंडागळे यांनी बोरी बुद्रुक गटातून पत्नी जयश्री यांना उमेदवारी मागितली होती; मात्र निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) यांची आघाडी करण्यात आल्याने निवडणूक न लढविता पक्षाचे काम करा, असा सल्ला पक्ष नेतृत्वाने खंडागळे यांना दिला होता. त्यामुळे नाराज झालेल्या खंडागळे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून पत्नी जयश्री यांना शिवसेनेची उमेदवारी मिळवली. या गटात झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना काळे या ९ हजार ७१३ मते मिळवून विजयी झाल्या. पवार यांच्या भूमिकेमुळे तिरंगी लढतीचा फटका बसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बोरी बुद्रुक गणातील उमेदवार प्रगती बढे यांचा पराभव झाला. या गणातून शिवसेनेच्या माधुरी निलख विजयी झाल्या. तसेच पवार यांच्या नाराजीचा फटका राजुरी गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार स्नेहल शेळके यांनाही बसला.

...अन्‌ प्रतिष्ठाही गमावली
मागील २५ ते ३० वर्षांपासून पवार व खंडागळे हे अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे निष्ठावान नेते होते. पक्षाने त्यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती; मात्र पक्षाचा आदेश न मानता त्यांनी निवडणूक लढवली. या दोघांच्याही उमेदवारांना मतदारांनी नाकारले, त्याबरोबरच तालुकाध्यक्ष पदही गेले. त्यामुळे तेल गेले तूप गेले, अशी अवस्था सद्य:स्थितीत पवार व खंडागळे यांची झाली असल्याची चर्चा आहे.

पक्षादेश न मानणे पडले महागात
अक्षदा पानसरे-मांडे यांना माजी आमदार अतुल बेनके यांनी तालुका युवती अध्यक्षपदाची संधी दिली होती. त्यांचे पती प्रसाद हे बेनके यांचे खासगी सचिव होते. अक्षदा या ओतूर गटातून इच्छुक होत्या; मात्र ऐनवेळी या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. छाया तांबे यांना उमेदवारी दिली. पक्षाचा आदेश न मानता नाराज झालेले प्रसाद पानसरे व त्यांच्या पत्नी अक्षदा यांनी आमदार शरद सोनवणे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. डॉ. तांबे या ११ हजार ३४६ मते मिळवून विजयी झाल्या.

बंडखोरी महागात
माजी आमदार बेनके यांचे विश्वासू मित्र व खामगावचे माजी सरपंच अजिंक्य घोलप यांनी पत्नीसाठी बारव गणातून उमेदवारी मागितली होती; मात्र पक्षाने अश्विनी केदारी यांना उमेदवारी दिली. अश्विनी या ४ हजार ९७५ मतांनी विजयी झाल्या. पक्षाचा आदेश न मानता निवडणूक लढवली; मात्र पराभव झाल्याने पवार, खंडागळे, पानसरे -मांडे व घोलप यांची अवस्था आता ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT