पुणे

कृषिपंपांच्या केबल चोरट्यांचा सुळसुळाट

CD

नारायणगाव, ता. १७ : वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील मेहेर-बनकर मळा परिसरात मंगळवारी (ता. १७) पहाटे अज्ञात चोरट्यांनी तीन शेतकऱ्यांच्या कृषिपंपांच्या केबल चोरून नेल्या. सततच्या चोरीच्या सत्रामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
राजेंद्र मेहेर, एकनाथ मेहेर आणि राहुल मेहेर या शेतकऱ्यांच्या पंपांच्या केबल चोरीला गेल्याचे सकाळी उघडकीस आले. मागील आठवड्यातही याच भागातील चार शेतकरी आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेची केबल चोरीला गेली होती. शनिवारी (ता. ७) येडगाव धरण परिसरातूनही १० लाखांच्या केबल चोरीला गेल्याची घटना ताजी आहे.केबलमधील तांब्याची तार काढण्यासाठी चोरटे हे कृत्य करतात. यामुळे शेतकऱ्यांना प्रति मीटर ६० ते ७० रुपये दराने नवीन केबल खरेदी करावी लागत असून, सुमारे चार हजार रुपयांचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. बाजारभाव नसल्याने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत या चोरीमुळे भर पडली आहे. केबल चोरट्यांसह तांब्याची तार खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी सरपंच राजेंद्र मेहेर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT