नारायणगाव, ता.२४: कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातून शेती सिंचन व बिगर सिंचनासाठी उन्हाळी पहिल्या आवर्तनात ७.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय
मंगळवारी (ता.२४) दुपारी मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. कुकडी डावा कालव्यासाठी ४.३ टीएमसी तर उर्वरित पिंपळगाव जोगे, मीना शाखा, डिंभे डावा व उजवा या कालव्यासाठी ३.३ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिली.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, कृष्णा खोरे विकास महामंडळ पदाधिकारी बैठकीस उपस्थितीत होते. यावेळी धरणातील पाण्याचा आढावा घेण्यात आला. पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रकल्पाअंतर्गत धरणात ऑगस्ट अखेर पिण्याचे पाणी शिल्लक राहील. या बाबत चर्चा करण्यात आली.
कुकडी प्रकल्पांतर्गत धरणात मंगळवारअखेर १७.९९५ टीएमसी(६०.६४ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळी पहिल्या आवर्तनात येडगाव धरणातून
२५० किलोमीटर लांबीच्या कुकडी डावा कालव्यात पाच मार्च ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान (३६ दिवसात) ४.३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा लाभ जुन्नर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यांना होणार आहे. पिंपळगाव जोगे, मीना शाखा, डिंभे डावा व उजवा या कालव्यात २५ फेब्रुवारी ते एक मार्च २०२६ दरम्यान (आवश्यकतेनुसार) ३.३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर या तालुक्यांना शेती सिंचन व बिगर सिंचनासाठी होणार आहे.
कुकडीचे रब्बीचे आवर्तन २६ डिसेंबर २०२५ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यान पूर्ण करण्यात आले. या आवर्तनात ६.२२ टीएमसी पाणी वापर झाला. उन्हाळी पहिल्या आवर्तनात ७.६ टीएमसी पाणी वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर शिल्लक पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
- गणेश नान्नोर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १
धरणनिहाय मंगळवार अखेर उपयुक्त पाणी साठा टीएमसी (कंसात टक्के):
धरण...... टीएमसी ...... टक्के
येडगाव...... १.७...... ८७.५४
माणिकडोह ...... ४.९६...... ४८.७५
वडज...... ८९४ ...... ७६.२५
पिंपळगाव जोगे...... २.३८५...... ६१.३२
डिंभे...... ८.०५ ...... ६४.४३
चिल्हेवाडी...... ०.६७४...... ८४.०२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.