नारायणगाव, ता. ७ : महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत, आत्मविश्वास वाढून शारीरिक, मानसिक, बळ निर्माण व्हावे, मन मस्तक आणि मनगट मजबूत व्हावे, या उद्देशाने राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवप्रताप युद्ध कला प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात सुमारे दीडशे शालेय विद्यार्थी, महिला सहभागी झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या नेहा पाटे यांनी दिली.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील मुक्ताई गार्डन मैदानात दहा दिवसीय शिवप्रताप युद्ध कला प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. प्रशिक्षणाचे उद्घाटन नेहा पाटे, पंचायत समिती सदस्य सुषमा वाव्हळ यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश आणि माहिती सांगितली. सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख योगेश पाटे, नारायणगाव शहरप्रमुख संतोष वाजगे, श्री मुक्ताबाई देवस्थानचे विश्वस्त अजित वाजगे, सचिव विकास तोडकरी, ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे उपस्थित होते.
या दहा दिवसीय प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना तलवारबाजी, लाठी काठी, दांडपट्टा, विविध युद्ध कला आदींचे प्रशिक्षण ब्रेव वॉरियर्स इंडियन मार्शल आर्ट्स व कराटे संस्थेचे प्रशिक्षक विशाल पिंगळे व मयूर भोसले यांनी दिले. प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रशिक्षणामुळे आपण आपले स्वसंरक्षण करू शकतो असा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण होणार आहे. या माध्यमातून शिवकालीन युद्ध कलेची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
- विशाल पिंगळे, प्रशिक्षक
नारायणगाव (ता. जुन्नर) : तलवारबाजी व लाठीकाठीचे प्रशिक्षण घेताना विद्यार्थी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.