पुणे

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नारायणगावात स्वच्छता

CD

नारायणगांव, ता. ४ : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा (ता. अलिबाग) यांच्या वतीने नारायणगाव, वारूळवाडी ग्रामपंचायत परिसरात आज स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिष्ठानच्या ३७५ श्रीसदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन १० टन कचरा जमा केला. महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. आपला परिसर स्वच्छ राहावा तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता व्हावी या उद्देशाने स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
नारायणगाव बस स्थानकाजवळ स्वच्छता अभियानाचा प्रारंभ आमदार शरद सोनवणे, उपसरपंच योगेश पाटे, नारायणगाव बसस्थानकाचे प्रमुख अशोक खंडागळे व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
प्रतिष्ठानच्या सदस्यांनी नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील जुना पुणे-नाशिक महामार्ग, पोलिस स्टेशन, बसस्थानक, मीना नदीकाठ, बाजार समिती परिसरातील चार हजार तीनशे चौरस मीटर जागेचे व १६.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगतच्या भागाची स्वच्छता केली. पाच तासाच्या स्वच्छता अभियानात तीन टन ओला व सात टन सुका असा एकूण १० टन कचरा जमा करण्यात आला. कचरा जमा करण्यासाठी नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने ट्रॅक्टर व ट्रॉल्या उपलब्ध करून दिल्या होत्या. जमा झालेला कचरा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून कचरा डेपोपर्यंत नेऊन त्याची विल्हेवाट लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT