पुणे

पंधरा दिवसांच्या प्रतीक्षे नंतर खडकवाडी येथील मादी बिबट जेरबंद.

CD

नारायणगाव, ता. ९ : येथील (ता. जुन्नर) खडकवाडी, पाटे-खैरे मळा शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांच्या जोडीतील बिबट मादी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. खडकवाडी येथील मीना शाखा कालव्याच्या पोटचारीजवळ पंधरा दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (ता. ९) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मादी बिबट जेरबंद झाली.

मागील दोन महिन्यांपासून बिबट्याच्या जोडीचे खडकवाडी शिवारात वास्तव्य होते. उसाच्या शेताजवळून जात असलेल्या मेंढपाळावर बिबट्याने हल्ला केला होता. या भागातील पाळीव कुत्री व जनावरे बिबट्यांनी फस्त केली आहेत. येथील चिकूच्या बागेजवळ काल दुपारी बिबट्याची जोडी आढळून आली होती. या दोन्ही बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी नामदेव खैरे यांनी वनविभागाकडे केली होती.
बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवाडी व पाटे-खैरे मळा येथे प्रत्येकी एक पिंजरा लावण्यात आला होता. पंधरा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मादी बिबट आज पहाटे पिंजऱ्यात जेरबंद झाली. दुसरा बिबट जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी पुन्हा पिंजरा लावण्यात येणार आहे,अशी माहिती मास्टर ट्रेनर भुजबळ यांनी दिली.
दरम्यान, जेरबंद बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.


07961

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Tamil Nadu Election: विजयच्या पक्षात भावनिक कथा! तिकीट मिळाल्यावर रडलेला ड्रायव्हरचा मुलगा जिंकला की हरला? उमेदवाराची कहाणी चर्चेत

मला दाखव, काय लिहिले आहेस? Raghu Sharma ने विकेट घेताच खिशातून पेपर काढला, सूर्यकुमार यादव वाचायला गेला; भावनिक संदेश...

Pinarayi Vijayan: १० वर्षांच्या सत्तेनंतर मोठी पडझड! LDF पक्षाचा दारुण पराभव, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, UDF ची दमदार एंट्री

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

SCROLL FOR NEXT