पुणे

बदलत्या हवामानानुसार टोमॅटोची लागवड करा

CD

नारायणगाव, ता. ११: योग्य व्यवस्थापन केल्यास टोमॅटो पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन व आर्थिक लाभ मिळू शकतो. बदलत्या हवामानाचा विचार करून टोमॅटो लागवड करताना योग्य वाणांची निवड करावी. ठिबक सिंचनचा वापर करून रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा, असे आवाहन टोमॅटो लागवड व व्यवस्थापन विषय तज्ज्ञ सुशील धुमाळ
यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नर व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव-दाभाडे यांच्या वतीने बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजार आवारात टोमॅटो लागवड व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तज्ञ सुशील धुमाळ,राष्ट्रीय सुगी पाश्चात्त्य तंत्रज्ञान संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक अमोल भोंग यांनी शेतकऱ्यांना टोमॅटो लागवड व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.


यावेळी बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती निवृत्ती काळे, संचालक सारंग घोलप, नाना घोडे, माऊली खंडागळे, प्रियंका शेळके, नबाजी घाडगे आरती वारुळे, पांडुरंग गाडगे, जनार्दन मरभळ, जितेंद्र कासार, प्रकाश ताजणे, सचिव रूपेश कवडे, सहसचिव शरद घोंगडे, शेतकरी संघटनेचे सचिन थोरवे, प्रमोद खांडगे, टोमॅटो व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.
यावेळी सभापती संजय काळे म्हणाले की, टोमॅटो,कांदा तसेच धना मेथी व भाजीपाला या मालाला अधिकचा बाजारभाव मिळावा, शेतकऱ्यांना मालाचे पैसे वेळेत मिळावेत. असा बाजार समितीचा कटाक्ष आहे. राज्यात पहिल्या पाच क्रमांकात नारायणगाव टोमॅटो बाजाराचा समावेश होतो.

उपसभापती निवृत्ती काळे यांनी सूत्रसंचालन तर सचिव रूपेश कवडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

IPL म्हणजे बिझनेस, मनोरंजन... क्रिकेट नाहीच! काव्या मारनच्या संघातील सदस्याचा मोठा दावा; म्हणाला, इथे खेळाच्या विकासापेक्षा...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तहसील येथे चर्मकार समाजाचे निदर्शने करत आंदोलन

Maharashtra Result Day : राज्य मंडळाचा नवा निर्णय; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार

Grandson Property Rights India : ... तर आजोबाच्या संपत्तीत नातवाला मिळणार नाही हिस्सा, नवा नियम काय सांगतो ?

SCROLL FOR NEXT