पुणे

नारायणगावात कर्तबगार महिलांचा सन्मान

CD

नारायणगाव, ता. १२ : ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधत जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला.
येथील ताराई कृषी पर्यटन केंद्रात कर्तबगार महिला सन्मान २०२६ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे होते. साईबाबा, राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर, जुन्नर तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे, सानेगुरुजी कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे, तालुका शिक्षक पतसंस्थेचे सभापती सचिन मुळे, संचालक रवींद्र वाजगे, अंबादास वामन, जितेंद्र मोरे, केंद्रप्रमुख दिनेश मेहेर, प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष शरद शिंदे, सुरेश गडगे, रियाज मोमीन, सुनील हाडवळे, मनोहर वायकर, मनीषा कानडे आदी उपस्थित होते.

उपस्थितांच्या हस्ते सामाजिक, शिक्षण, वैद्यकीय, प्रशासकीय क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, शिक्षण विस्तार अधिकारी अनिता शिंदे, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. केतकी काचळे, सबनीस विद्यामंदिरातील पर्यवेक्षिका अनुपमा पाटे, ॲड. भाग्यश्री नलावडे, महिला पोलिस सुमित्रा तळपे, आशा वर्कर अश्‍विनी वारुळे, उद्योजिका अश्‍विनी कोल्हे, कावेरी कोल्हे यांचा फेटा बांधून तसेच सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष कमलाकांत मुंढे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे सचिव रूपेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष ऊर्मिला वाजगे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT