पुणे

येडगावात शेतकऱ्याच्या ठिबकच्या पाइपची चोरी

CD

नारायणगाव, ता. ३० : येडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी सुरेश गोपाळा नेहरकर यांच्या शेतातील ठिबक सिंचन यंत्रणेच्या सुमारे १५ हजार रुपये किमतीच्या नळ्या व पाईप शुक्रवारी (ता. २७) रात्री चोरट्यांनी चोरून नेल्या.
याबाबत नेहरकर यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांनी येडगाव येथील शेतात फुलकोबीचे पीक लावण्यासाठी २७ मार्च रोजी नवीन ठिबक सिंचन यंत्रणा बसवली होती. लागवड करण्यासाठी फुलकोबीच्या ३० हजार रोपांचे रोपवाटिकेत बुकिंग केले होते. २८ मार्च रोजी रोपांची लागवड करण्याचे नियोजन होते. मात्र, २७ मार्च रोजी रात्रीच्या वेळी चोरट्यांनी शेतातील सर्व ठिबक सिंचनचे पाईप व नळ्या चोरून नेल्या. मागील वर्षी याच शेतातील झेंडूच्या पिकाचे अज्ञात व्यक्तीने नुकसान केले होते. नेहरकर हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीचे वारंवार नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT