पुणे

जुन्नरमध्ये गारपिटीमुळे द्राक्ष, आंब्यास फटका

CD

नारायणगाव, ता.३० :  जुन्नर तालुक्याच्या पश्चिम व मध्य भागात रविवारी (ता.३०) सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील वडज, निमदरी, तेजवाडी जुन्नर भागात गारपीट झाली. गारांचा आकार लिंबापेक्षा जास्त मोठा होता. गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, टोमॅटो, आंबा या फळ भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्याच्या नारायणगाव, गुंजाळवाडी, वारुळवाडी परिसरात सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. नारायणगावच्या तुलनेत गुंजाळवाडी परिसरात पावसाचे प्रमाण जास्त होते. गारपीटीचा सर्वाधिक फटका वडज, निमदरी, जुन्नर, तेजेवाडी परिसराला बसला. या भागातील आंबा, कांदा, टोमॅटो, द्राक्षे या पिकांची मोठे नुकसान झाले आहे. वडज भागात लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी वडज येथील शेतकरी राजू चव्हाण यांनी टोमॅटो पिकावर लावलेले आच्छादन गाराच्या तडाख्यामुळे फाटले. वाढलेला भांडवली खर्च, त्यात भाजीपाल्याला बाजार भाव नसल्याने मागील वर्षभर शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. सध्या तालुक्यात कांदा पिकाची काढणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात टोमॅटोची पीक घेतलेले आहे. नारायणगाव, गुंजाळवाडी, वडज भागातील उशिरा छाटणी झालेल्या काही द्राक्ष बागातील घड काढणीच्या अवस्थेत आहेत.

मुसळधार पाऊस व काही भागात झालेली गारपीट यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडलेला आहे. कृषी व महसूल विभागाने तातडीने पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अचानक गारपीट झाल्याने माझे मिरची, कांदा व टोमॅटो पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गाराच्या तडाख्यामुळे टोमॅटो बागेवरील आच्छादन फाटले आहे. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
- राजाभाऊ चव्हाण, प्रगतशील शेतकरी, वडज


08043

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT