नारायणगाव, ता. ७ : नारायणगाव परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडर गरजेनुसार उपलब्ध होत नाही. त्यामुळे एलपीजी गॅस ग्राहकांकडून वाढीव दराने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची खरेदी करून त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी करण्याचा नवीन फंडा काही हॉटेल आणि ढाबा व्यावसायिकांकडून केला जात आहे. यामुळे बहुतेक हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याचे दिसत आहे. याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला होता. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अल्प प्रमाणात पुरवठा केला जात आहे. गरजेनुसार व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने काही लहान, मोठे हॉटेल, ढाबा व्यावसायिक, हातगाडीवर वडापाव, पावभाजी, अमृततुल्य व अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी घरगुती ग्राहकांकडून तीन ते साडेतीन हजार रुपयांना गॅस सिलिंडर खरेदी करून तो व्यावसायिक कारणासाठी वापरण्याचा नवीन फंडा वापरला आहे. काही व्यावसायिक कारवाई टाळण्यासाठी घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅसचे व्यावसायिक सिलिंडरमध्ये पुनर्भरणा करून त्याचा वापर करत आहेत.
दरम्यान, नाव न देण्याच्या अटीवर येथील एजन्सीचे संचालक म्हणाले की, घरगुती ग्राहकाने ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ओटीपी पाहून ४५ दिवसानंतर त्यांना सिलिंडर दिला जातो. आदिवासी भागातील काही ग्राहक तसेच कुटुंबात दोन गॅस जोड असलेले ग्राहक टंचाईपूर्वी सिलिंडर खरेदी करत नव्हते. मात्र आता सिलिंडर खरेदी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.