पुणे

नारायणवाडीत शेतकऱ्यांमुळे तरसाच्या पिल्लांना जीवदान

CD

नारायणगाव, ता. ११: आईपासून दुरावलेल्या आणि अन्नावाचून व्याकुळ झालेल्या तरसाच्या दोन पिल्लांना नारायणवाडी (ता. जुन्नर) येथे जीवदान मिळाले. शेतकरी, आपदा मित्र सुशांत भुजबळ आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे या तीन महिन्यांच्या पिल्लांना सुरक्षितपणे माणिकडोह येथील निवारा केंद्रात दाखल केले आहे.
नारायणवाडी येथील एकनाथ कोकाटे यांच्या शेतात मागील चार दिवसांपासून ही पिल्ले अन्नाच्या शोधात फिरत होती. पिल्लांची आई दगावल्याने ती निराधार झाली होती. स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना दूध व पाणी देऊन वनविभागाला माहिती दिली. वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण व वनपाल अनिता होले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर पवार आणि सुशांत भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही पिल्लांना ताब्यात घेतले.
या पिल्लांमध्ये एक नर आणि एक मादी असून, त्यांच्यावर डॉ. अविनाश विसलकर व डॉ. महेंद्र ढोरे यांनी प्राथमिक उपचार केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.
08074

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT