पुणे

गावठी कट्टे बाळगल्याप्रकरणी निमगाव सावात तिघांना अटक

CD

नारायणगाव, ता. २२ : बेकायदेशीररीत्या गावठी कट्टे बाळगल्याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे सापळा रचून तीन तरुणांना अटक केली. आरोपींकडून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूस, इर्टिगा मोटार, असा ५ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना जुन्नर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
या प्रकरणी राहुल साळवे (रा. साकोरी, ता. जुन्नर), दर्पण सुरेश पवार (वय २२, रा. नारायणगाव, ता. जुन्नर), तेजस संदीप मातेले (वय २१ रा. नारायणगाव) यांना अटक केली आहे. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी सोमवारी (ता. २०) जुन्नर तालुक्यात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान नारायणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारफाटा, निमगाव सावा येथे काही तरुण गावठी कट्टे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून इर्टिगा मोटारीतून आलेल्या तीन संशयित तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती केली. या वेळी राहुल साळवे, तेजस मातेले यांच्या कमरेला खोसलेले दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, प्रवीण सपांगे, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलिस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained : शिंदेंना ठाकरेंचे खासदार फोडण्याची गरज का भासली? पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? थेट मुद्दा समजून घ्या...

Prithviraj Chavan: सहकाराचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी: पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा कारखान्यात परिवर्तनाची हाक, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

Kolhapur Wrestler Death : भिंतीवर खुरपे मारताना विजेच्या तारेला हात लागला अन्; १३ वर्षीय पैलवानाबाबत घडली हृदयद्रावक घटना

Who is Yoane Wissa? रोनाल्डोच्या पोर्तुगालला रडवणाऱ्या योआन विसावर झालेला अ‍ॅसिड हल्ला! मृत्यूच्या दारातून प्रेरणादायी पुनरागमन

Monsoon Active Again : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; मॉन्सून पुन्हा होणार सक्रीय, पुढच्या चार दिवसात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT