नारायणगाव, ता. ६ : नारायणगाव येथील पाटे-खैरे मळ्यातील विद्युत रोहित्रामधून ठिणग्या पडल्याने शेतातील गवताला आग लागली. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक नागरिकांनी आग विझवल्याने पुढील दुर्घटना टळली. येथील रोहित्रातुन पडलेल्या ठिणग्यामुळे यापूर्वी सुद्धा उसाच्या शेताला आग लागली होती.
येथिल रोहित्राला जोडलेली फ्युज पेटी सुद्धा उघडी असून धोकादायक स्थितीत आहे. या परिसरात लोक वस्ती आहे. आगीची घटना रात्रीची घडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. पावसाळ्यापूर्वी रोहित्राची आणि फ्यूज पेटीची दुरुस्ती करावी आणि रोहित्र अन्य ठिकाणी हलवावे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाटे-खैरे मळा येथील गट नंबर ४४४ मध्ये २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र आहे. त्याद्वारे सुमारे २८ कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो. रोहित्राची फ्यूज पेटी उघडी असून फ्यूज वारंवार ना दुरुस्त झाल्याने वीज पुरवठा सुद्धा खंडित होतो. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आज दुपारी अचानक रोहित्रामधून ठिणग्या पडून आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिक स्वप्निल पाटे, धनेश पाटे यांनी पोलिस पाटील सुशांत भुजबळ, महावितरणचे अभियंता बी. एस. बिराजदार यांना दिली. स्थानिकांनी आग विझवली. त्या नंतर घटनास्थळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.