पुणे

‘राजगड’च्या हद्दीत चोऱ्यांनी गाठली शंभरी वर्षभरात एकूण ४६७ गुन्ह्यांची नोंद; अपघातातील मृत्यू ६५ तर ९४ जखमी

CD

नसरापूर, ता. ३ : राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षभरात एकूण ४६७ गुन्ह्यांची नोंद झाली असून, चोरी, जबरी चोरी, दरोडा व घरफोडी यामध्ये शतक पार होऊन १११ घटनांची नोंद झाली आहे. तर वर्षभरात अपघातात ६५ जणांचे प्राण गेले आहेत व ९४ जण जखमी झाले आहेत.

या पोलिस ठाण्याच्या हद्दीत भोर व हवेली तालुक्यातील मिळून ८१ गावे असून, या अंतर्गत नसरापूर, किकवी, शिवापूर व शिंदेवाडी या चार चौक्या आहेत. पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह ४७ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. शहराला लागून असलेला बराचसा भाग तसेच पुणे-सातारा महामार्गाचा सुमारे २० ते २२ किलोमीटरचा भाग या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने येथे गुन्ह्यांची संख्या नेहमीच जास्त असते. त्याचप्रमाणे महामार्गावरून जाणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा विचार करता, येथील पोलिसांची कायमच धावपळ असते. यासाठी पुरेसा वाढीव कर्मचारी वर्ग येथे असणे गरजेचे आहे.

पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे, नितीन खामगळ, फौजदार संजय सुतनासे, निखिल मगदूम, श्रीकांत जोशी या अधिकाऱ्यांसमवेत सर्व पोलिस कर्मचारी सतर्क राहून पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर वचक ठेवून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger : ५० कोटींचे डील, प्रत्येकाला १५ कोटी अ‍ॅडव्हान्स, राऊतांचा आरोप; दिल्लीत दाखल झालेले ठाकरेंचे ६ खासदार कोण?

Kolhapur Water Update : नऊ नद्यांवरील उपसाबंदी शिथिल; 'इरिगेशन फेडरेशन'च्या मागणीनंतर 'जलसंपदा'चा निर्णय, पाहा तुमच्या भागातील नदीचा समावेश आहे का?

Uddhav Thackeray MP: ठाकरेंच्या ६ खासदारांभोवती राजकीय सस्पेन्स कायम! अपात्रतेचा धोका की नवा राजकीय डाव? कायदा नेमकं काय सांगतो?

Fifa World Cup 2026 : लिओनेल मेस्सीची हॅटट्रिक, वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी अन् अश्रू अनावर; अर्जेंटिनाचा अल्जेरियावर दणदणीत विजय

Global Inflation: युद्ध संपले तरी महागाईची धग कायमच! इंधन, प्रवास, मालवाहतूक दर लगेच कमी होणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT