पुणे

सावकाराच्या त्रासाला कंटाळून कुरंगवडीत एकाची आत्महत्या

CD

नसरापूर, ता.२१ : अवैध सावकाराच्या त्रासाला कंटाळून सतीश बाजीराव शिळीमकर (वय ४३ रा. कुरंगवडी, ता.भोर ता. भोर) यांनी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी व त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीनुसार राजगड पोलिसांनी सावकाराविरुध्द आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (ता.२०) घडली.
व्याजाने घेतलेल्या पैशाचे पाच वर्षे व्याज देऊन मुद्दलही दिले असतानाही आणखी २८ लाख रुपयांची मागणी संबंधित सावकार करीत होता. तसेच कोरे चेक घेऊन जमिनीची देखील मागणी करत असल्यामुळे शिळीमकर यांनी राहत्या घराच्या शेजारील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी ''अमृत महादेव शिळीमकर (रा. तांभाड, भोर) यांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेवर पाच वर्ष व्याज दिले. त्याचे मुद्दलही दिली आहे. तरी तो २८ लाख रुपये मागत असून, त्याबदल्यात माझ्याकडून जमीन मागत आहे. म्हणून मी माझा जीव देत आहे'' असा उल्लेख केला आहे. यावर मृताची पत्नी वैशाली सतीश शिळीमकर यांनी याबाबत राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यामुळे राजगड पोलिसांनी अमृत शिळीमकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. पुढील तपास फौजदार संजय सुतनासे करत आहेत.


03066

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT